जिल्ह्यात जयंती साजरी : जिल्हा प्रशासनानेही वाहिली आदरांजलीभंडारा : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.आंबेडकर वॉर्ड तुमसर तुमसर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे देशभक्ती कर्तव्यनिष्ठा व त्याचे आदर्श हे आधुनिक युगातील स्त्रियांकरिता प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे यांनी केले. स्थानिक आंबेडकर वॉर्डात आयोजित इंदिरा गांधी जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी ममता वासनिक, सुवर्ण मेश्राम, सविता बोंबार्डे, संध्या गौरकर, लता वैद्य, शालु वाहने, प्रीती माने, लता गोंडाणे, दुर्गा वैद्य, सत्यभामा डोंगरे, कल्पना चौव्हाण, नेतावंती वासनिक, चंदाकिरण रंगारी, फुलन चौरे, ममीता मेश्राम, कीर्ती पाटील, नम्रता तिबुडे, ओमिनी भुरे, तिरनैना मेश्राम उपस्थित होत्या. संचालन राजश्री मलेवार यांनी तर आभारप्रदर्शन वैशाली भवसागर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पवनी शहर काँग्रेस कमेटीपवनी : न डगमगता, देशाला प्रगतीवर नेण्याकरिता कणखर भुमिका घेवून बँकाचे इंदिराजीनी राष्ट्रीयीकरण केले. विरोध होत असतांनाही त्यांनी १९६९ साली राजा, संस्थानीकरांचे तनखे बंद केले. त्यांनी जगाच्या राजकारणात ठसा उमटवीला. देश दुष्काळाच्या छायेत असताना गरीबी हटाओ नारा देवून देशात हरितक्रांती आणल्यामुळे आज देश अन्नधान्याबाबतीत स्वयंपुर्ण झाला. त्या लोह महिलेच्या रुपाणे पुढे आल्या हे विचार सुप्रसिध्द साहित्यीक, पत्रकार पुरुषोत्तम भिसेकर यांनी पवनी शहर काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, अध्यक्षस्थानी माणिक ब्राम्हणकर तर प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, विकास राऊत, धर्मेंद्र नंदरधने, प्रकाश पचारे, न.प. उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, डॉ. योगेश रामटेके, अशफाक पटेल, अशोक राऊत होते. याप्रसंगी मान्यवरांनी समयोचीत मार्गदर्शन करुन स्व. इंदिराजी प्रती आदरांजली वाहिली. आपल्या मार्गदर्शनात सावरबांधे यांनी सांगितले की, बँकाच्या राष्ट्रीयकरणामुळे आज सामन्यांना गरीबांना कर्ज मिळत आहे. प्रास्ताविक विकास राऊत, संचालन प्रकाश पचारे व आभार धर्मेंद्र नंदरधने यांनी केले. याप्रसंगी तुळशीराम बिलवने, केशवराव शिंदे, गजानन भोयर, माया भोगे, यामीनी बारापात्रे, तारा नागपुरे, फकीरा नागपुरे, निलकंठ मानापुरे, राजेश देशकर, अवनती राऊत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)प्रशासनाने दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथभंडारा : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. हिंसाचाराचा अवलंब न करता सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.
इंदिरा गांधी महिलांसाठी प्रेरणादायी
By admin | Published: November 21, 2015 12:32 AM