यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील जवळपास ४९५ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड, तर उर्वरित २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रात धान रोवणी करण्यात आली आहे. यंदा पावसाळ्याच्या दरम्यान तालुक्यात केवळ एकदा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांकरवी कृषी पंप व अन्य बांधांच्या नहरांद्वारे उपलब्ध पाण्याने शेती सिंचित करून धान पिकाची लागवड करण्यात आली. या लागवडीनुसार शेतातील धान पिकांची स्थिती समाधानकारक असताना देखील गत काही दिवसांपासून अनियमित पाऊस व वातावरण बदलामुळे धान पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या प्रादुर्भावाअंतर्गत तालुक्यातील बहुतांश क्षेत्रात गादमास कीड रोगाचा प्रभाव दिसून येत आहे, तर काही क्षेत्रातील धान पिकावर करपा, कीड रोगाचा प्रभाव असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, येत्या काही महिन्यांत खोडकिड्यासह पिकांच्या अंतिम दिवसांत तुडतुडा कीड रोगाची संभाव्यता व्यक्त केली जात आहे. पिकांना कीड रोगाच्या बचावासाठी आवश्यक औषधी कमी किमतीत उपलब्ध करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.
180821\4716img-20210818-wa0033.jpg
तालुक्यातील विहीरगाव शेतशिवारातील शेतातील धानपिकावर असलेला गादमाशिचा प्रादुर्भाव