लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे.जून अखेरपासून बाजारात येणारा भाजीपाला हा दिवसेंदिवस कमी येत असल्याने दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजट कोलमडले असून भाजीपाला खरेदी करणे कठीण होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय कमी असल्याने नागपूर मधून येणाºया भाजीपाल्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहे.भंडारा येथील मोठा बाजारात ग्रामीण भागातील येणाºया शेतकऱ्यांचा माल हा दुर्मिळ झाला आहे. त्यातच टोमॅटो, फुलकोबी, पालेभाज्या यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. वातावरण ढगाळ राहत असल्याने उत्पादन घटले असून शेतकºयांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्याचाच परिणाम भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यासंह फुलकोबीचे दर हे वाढले आहे. हिरवी मिरची देखील महागल्याने सर्व सामान्यांना भाजीपाला खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. जुलै महिना संपत आला तरी पुन्हा एकदा पावसाचा खंड पडल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात भाजीपाला मिळणे कठीण होत आहे.दर आवाक्याबाहेरदररोजच्या आहारात वापरात असलेली हिरवी मिरची ८० रुपये किलो तर फुलकोबी ६० ते ७० रुपये किलो इतर पालेभाज्याही महागल्याने सर्वसामान्य गुहिणींना भाजीपाला खरेदी करणे जिकरीचे झाले आहे. सांभार २५० रुपये, लहसून १०० रुपये, काकडी २० रुपये, अद्रक १३० रुपये किलो पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने उपलब्ध असल्याने थोक विक्रेत्यांकडून किरकोळ बाजारात विक्रेत्यांकडे पोहचेपर्यंत भाजीपाल्याचे दर दुप्पट होत असल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण होत आहे.
पावसाच्या हुलकावणीने भाजीला महागाईची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:29 PM
यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे.
ठळक मुद्देबाजारातील आवक घटली : पालेभाज्यांचे दर भिडले गगणाला