लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : ढिवरवाडा या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रामध्ये अपघातामध्ये ठार होवून दोन हरीण पुरल्याची माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांना लागल्याने सोमवारला प्रादेशिक वनविभागातील कर्मचारी व कोका अभयारण्यातील वन कर्मचाºयांनी नदीपात्रात शोध मोहिम राबविली. मात्र कुठेच हरीण पुरल्याचे दिसून आले नाही.ही मोहिम कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एस. जाधव यांच्या नेतृत्वामध्ये वनरक्षक डी.एस. बोरकर, आर.बी. रामटेके, वी.आर. शेंडे, राजु नागपुरे, अमित राऊत, एम.एस. हाके, जी.एन. नागरगोजे, वनपाल ओ.एस. बनोडे, आय.आर. शेख, सुरेश शेंडे, सरपंच वनवे, वनपाल टी.एन. कावळे, के.के. बन्सोड, ए.डी. सावसाखडे, एस.एस. रामटेके, एन.सी. उईके यांनी भाग घेतला.यावेळी श्वानपथक सहाय्याने शोध मोहिम घेण्यात आली. या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव असून अभयारण्यामधून राज्यमार्ग गेल्याने सुसाट वाहने धावत असतात.वन्यप्राणी रस्त्यावर येत असल्याने ते वाहनाखाली येतात. अपघातामध्ये दोन हरिणाचा मृत्यू होवून ते नदीपात्रामध्ये पुरल्याची खबर वनविभागाला लागली असल्याने ही मोहीम राबविण्यात आली.
नदीपात्रात हरीण पुरल्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:49 PM
ढिवरवाडा या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रामध्ये अपघातामध्ये ठार होवून दोन हरीण पुरल्याची माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांना लागल्याने सोमवारला प्रादेशिक वनविभागातील कर्मचारी व कोका अभयारण्यातील वन कर्मचाºयांनी नदीपात्रात शोध मोहिम राबविली. मात्र कुठेच हरीण पुरल्याचे दिसून आले नाही.
ठळक मुद्देशोधमोहीम सुरू : अपघात की शिकार?