शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

माहिती हीच शक्ती

By admin | Published: March 19, 2016 12:27 AM

आजच्या युगात माहिती हीच खरी शक्ती असून माहितीचे भांडार स्वत:वर असेल तर आपण आपला तसेच देशाचा विकास साधू शकतो, ...

विशेष प्रचार कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : आजच्या युगात माहिती हीच खरी शक्ती असून माहितीचे भांडार स्वत:वर असेल तर आपण आपला तसेच देशाचा विकास साधू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्या वतीने आज लाखनी येथे आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी लाखनी पंचायत समितीच्या सभापती रजनी आत्राम, अग्रणी जिल्हा बँक, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक संजय पाठक, नागपूर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने उपस्थित होते. जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती गावांपर्यत आणि प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचणे आवश्यक असून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मोबाईलद्वारे पोहचविण्यात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी दिली. शेती सोबतच शेतीला पुरक असणाऱ्या व्यवसायाकडे लोकांनी वळण्याचे आवाहन करुन जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, आंध्र प्रदेशातील शेतकरी शेती सोबतच इतरही व्यवसाय करीत असून इतरही व्यवसाय करीत असून इथे सुध्दा मत्स्यपालन तसेच इतर व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळल्यास त्यांना आर्थिक मदत होईल. राज्य सरकारने मागेल त्याला शेततळी ही योजना लागू केली असून याबाबतही शेतकऱ्यांनी पुढे येवून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी केले. रजनी आत्राम यांनीलेक वाचवा लेक शिकवा असे सांगून मुलांना शिक्षणासाठी सर्वांनी प्रोत्साहन करण्याचे आवाहन केले. यावेळी दिशा गद्रे, गिरीधर टेरे यांनी कौशल्य विकास, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक संजय पाठक यांनी पंतप्रधानाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच विस्तार माध्यम अधिकारी एन. आर. पाखमोडे यांनी विचार व्यक्त केले. प्रस्ताविक मनोज सोनोने यांनी केले. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आज सकाळी लाखनीच्या जि. प. गांधी विद्यालयाच्या प्रांगणातून जनजागरण रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास नागपूरच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक रामचंद्र सोनसळ तसेच वर्धा येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक संजय तिवारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)