व्यापार ठप्प : दिव्यांग, ज्येष्ठ, महिला, अंधांना मनस्तापतुमसर : ५०० व एक हजारांच्या नोटा बंदीनंतर सामान्य स्थितीची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.परंतु सात दिवसानंतरही बँकेमध्ये लांबच लांब रांगा दिसत आहेत. बाजारात लहान व्यवसायीक ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे. तर सर्वसामान्य नागरिक बँकेत प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. तुमसर व्यापारी नगरीचा व्यवसाय पूर्णत: ठप्प पडला आहे. बोटावर शाई व वेगळ्या रांगा र्बंकेत दिसल्या नाही.५०० व एक हजारांच्या नोटा बंदीचा लटका जाणवू लागला असून उद्योग, व्यवसाय, नोकरदार व शेतकरी बँकेच्या दारात उभा दिसत आहे. सर्वच बँकेत तोबा गर्दी आहे. बँक तथा एटीएम समोर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे. एटीएममध्ये रुपये नाही. कुठे आहेत तर त्यातून दोन ते अडीच हजार रुपये मिळत आहेत. राष्ट्रीयकृत बँकेतून दोन हजारांच्या नोटा वाटप सुरु आहे. या नोटा चलनात दिसत नाहीत. दोन हजारांची नोट दिल्यावर उर्वरीत सुटे कुठून देणार? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुने नोटा बंदी आणल्यावर नोकरदार शेतकरी, लहान व्यापारी, सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून मात्र नागरिकांनी खात्यातून नोटा काढण्याकरिता मोठी गर्दी केली होती. बंद नोटा बँकेत जमा करण्याकरिता एकापेक्षा अधिक वेळा जाणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय झाला. परंतु तुमसरात बुधवारी बँकांनी शाई लावली नाही. बुधवारी तुमसरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा करण्यात आल्याची माहिती आहे. बँकेकडे पुरेशा नोटा अद्याप पोहचलेल्या नाही. त्यामुळे नागरिकांना नोटा वितरण करताना बँकेची तारांबळ उडत आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळ्या रांगा बँकेत दिसून आल्या नाहीत. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘नोटांसाठी’ बोटावर शाई लागलीच नाही
By admin | Published: November 18, 2016 12:33 AM