शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निर्भीड पत्रकारिता ही काळाची गरज

By admin | Published: January 07, 2017 12:32 AM

पत्रकारांनी वृत्तसंकलन करताना कधीही कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी पडी नये.

नाना पटोले : मराठी पत्रकार दिन उत्साहातभंडारा : पत्रकारांनी वृत्तसंकलन करताना कधीही कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी पडी नये. समाजाचे सजग प्रहरी होवून वृत्तपत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजाचे दर्पण झाले पाहिजे. निर्भीड पत्रकारिता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्य प्रवर्तक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती आज मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी खा. पटोले बोलत होते.यावेळी पत्रकार संघाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शासन यात मोठा सहभाग घेईल अशी हमी खा. नाना पटोले यांनी दिली. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील तीन दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रा. वामनराव तुरीले यांचा जीवनगौरव पुरस्कार तर डी. एफ. कोचे यांना भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे समर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आ. परिणय फुके यांनी सावध पत्रकारितेचा सल्ला दिला. तसेच आमदार निधीतून पत्रकार संघाला ५ लक्ष रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. आ. चरण वाघमारे यांनी ग्रामीण क्षेत्रातील पत्रकारांनाही न्याय मिळायला हवा. त्यांचा उत्थानासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे विषद केले. आ. रामंचद्र अवसरे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील पत्रकारिता ही अतिशय महत्वाची आहे. लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देण्याबरोबरच प्रशासनाला मार्ग दाखविण्याचे कार्य करते. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्यातील पत्रकारांनी तुलनात्मक दृष्ट्या पत्रकारिता करित असल्याबाबद समाधान व्यक्त केले. संघाकडून सर्व उपस्थित अतिथींना स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण क्षेत्रातून पत्रकारिता करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांचा गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला. यात नितीन कारेमोरे, रासेयो योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रा. बबन मेश्राम, सर्पमित्र प्रविण कारेमोरे, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विनोद भुजाडे, सांस्कृतीक कार्याबद्दल राहूल (गोल्डी) हुमणे, शैक्षणिक कार्याबद्दल श्रावण कळंबे, देवयानी हुमणे यांचा समावेश होता. संचालन नितीन कारेमोरे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन प्रा. बबन मेश्राम यांनी तर आभार पत्रकार संघाचे सचिव मिलिंद हळवे यांनी मानले. कार्यक्रमाला राकेश चेटुले, काशिनाथ ढोमणे, चंद्रकांत श्रीकोंडावार, सुरेश कोटगले, शशिकुमार वर्मा, नंदकिशोर परसावार, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, प्रमोद नागदेवे, तथागत मेश्राम, जयकृष्ण बावनकुळे, विजय क्षीरसागर, नरेश बोपचे, रवि धोतरे, वतनकुमार डोंगरे, पृथ्वीराज बन्सोड, मनोहर मेश्राम यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)