शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

‘ती’ चौकशी थंडबस्त्यात

By admin | Published: May 24, 2016 12:56 AM

तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला मुहूर्त सापडता सापडेना.

पुन्हा मुहूर्ताची प्रतीक्षा : कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण भंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला मुहूर्त सापडता सापडेना. प्रकरण उजेडात येण्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी चौकशी थंडबस्त्यात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र चौकशी समिती तेथे पोहचलीच नाही. चौकशीला बराच विलंब होत असल्यामुळे 'त्या' अधिकाऱ्यांना बड्या अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची शक्यता बळावली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला अंतर्गत असलेल्या उपकेंद्र दवडीपार येथे २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत लस आढळून आली होती. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान घेतले. मात्र घेण्यात आलेले बयान सार्वजनिक झाले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. बयान सार्वजनिक करणे गंभीर बाब आहे. त्यामुळे जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली. यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत पुन्हा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांच्या बयाणांचे रेकॉर्डिगही केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले होते. पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे बयान गोपनीय झाल्यासंबधीचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित झाल्यानंतर 'त्या' आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक़ १० मे रोजी चौकशी झालीच नाही. 'ते' अधिकारी वरिष्ठांच्या आशीर्वादाने बिनधास्त आहेत, यात शंका नाही. (नगर प्रतिनिधी) प्रकरण पोहोचले मंत्रालयात !पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणाची माहिती मंत्रालयात पाठविण्यात आली. यासंबधी 'लोकमत'ने पाठपुरावा केला होता. मंत्रालयात माहिती पाठविण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली जात होती. मात्र प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती मंत्रालयात पाठविल्याची विश्वसनिय माहिती आहे. तसा उल्लेख देखील माहितीपुस्तकात नोंद केली असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५४९३१०० वर सायंकाळी ५.१६ वाजता संपर्क केला असता त्यांनी 'मिटींगमध्ये आहे, नंतर बोलतो' असे उत्तर दिले.प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र बदल्यांची कार्यशाळा, जिल्हा आरोग्य अधिकारी मुबंईत व इतर कामे आल्यामुळे चौकशीसाठी जाता आले नाही. आठवड्याभरात चौकशीसंदर्भात तारीख निश्चित करण्यात येईल. तसे पत्र प्राप्त होताच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल.- प्रदीप बुराडे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा अध्यक्ष, चौकशी समिती, जि.प.भंडारा.