सिहोरा परिसरातील शेतकरी अळी व रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने हतबल झाला आहे. धान पिकांना वाचविण्यासाठी विविध औषधासाठी कृषी केंद्रांवर धाव घेत आहे. शेकडो एकरातील धान पीक फस्त होत आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदतीसाठी तालुक्यात कृषीचे दोन-दोन विभाग कार्यरत आहेत. परंतु कृषी विभागाची स्वतःहून कुठेही दिसून येत नाही. कार्यालयात बसून उपदेश करण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता दोन-चार दिवसांनंतर कर्मचारी धाव घेतात. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
बॉक्स
युरिया खताचा तुटवडा
सिहोरा परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खताचा तुटवडा आहे. कृषी केंद्रांवर खतच मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. खतासाठी नजीकच्या मध्य प्रदेशात धाव घेत आहे. छुप्या मार्गाने खताची आयात केली जात आहे. युरिया खतच नसल्याने कृषी केंद्र संचालकाना मानसिक ताण सहन करावा लागत आहे. रोज शेतकरी विचारणा करीत आहेत. खत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागत आहे. यामुळे तत्काळ खताचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.