लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अवकाळी पावसासह वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे उन्हाळी हंगामातील धान पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान पिकाची रोवणी झाली आहे. यावर्षीच्या दमदार पावसामुळे तालुक्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वारंवार फवारणी करुन देखील किड नियंत्रणात येत नसल्याने शेतकºयाच्या खर्चात वाढ झाली आहे. शासनाने कृषी विभागामार्फत शेतकºयांना मोफत औषधांचा पुरवठा करण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकºयांना पीक कर्ज भरण्यासाठी देखील पैसे नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. गत आठ दिवसांपासून कोरोना संकटाने शेतकºयांचा भाजीपाला बाजारपेठेत विक्री होत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांना तात्काळ शासनाने मदत करावी, अशी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
उन्हाळी धानासह भाजीपाला पिकांवर किडींचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM
तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.
ठळक मुद्देकडाकरपा रोगाने शेतकरी चिंतेत : भाजीपाला उत्पादक संकटात