शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

ब्रिथ अ‍ॅनालायझरअभावी चालकांची तपासणी होईना

By admin | Published: February 02, 2015 11:00 PM

भंडारा विभागात सहा आगार असून रापमने येथील चालक व वाहकांची अ‍ॅनालायझरने तपासणी करण्यासाठी केवळ दोनच मशीन पाठविल्या आहेत. सध्या या मशीन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आगारात आहेत.

भंडारा : भंडारा विभागात सहा आगार असून रापमने येथील चालक व वाहकांची अ‍ॅनालायझरने तपासणी करण्यासाठी केवळ दोनच मशीन पाठविल्या आहेत. सध्या या मशीन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आगारात आहेत. एस.टी. च्या चालकांना मोबाईल वापरासंबंधीही निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु आज घडीला बस चालवित असताना चालक सर्रासपणे मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. अपघात विरहीत सेवा देण्यासाठी कामावर रूजू होण्यापूर्वी बसचालकांची अल्कोहोल तपासणी करणे एसटी महामंडळाने अनिवार्य केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सहा आगाराकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केवळ दोन ब्रिथ अल्कोहोल अ‍ॅनालायझर मशीन पाठविली असल्याने मद्यपी चालकांच्या तपासणीत अडचण येत आहे. नव्या वर्षातील नियमानुसार कामावर रूजू होण्यापूर्वी प्रत्येक चालकाची तपासणी करणे अनिवार्य असून तपासणीशिवाय बस चालविण्याची परवानगी देता येणार नाही, असा नियम आहे. मात्र, या नियमाला फाटा देत जिल्ह्यातील तीन आगारात केवळ एक मशीन तर गोंदिया जिल्ह्यातील तीन आगारात एक मशीन पाठविण्यात आली आहे. या मशिनद्वारे चालकांची नाममात्र तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास चालकावर निलंबनाची कारवाई होवू शकते.दिवसेंदिवस एसटीचे वाढते अपघात रोखण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. मात्र बहुतांश ठिकाणी या योजना आणि नियमांची पायमल्ली होताना दिसते. अपघातास एसटी चालकाच्या चुकीबरोबरच अनेकवेळा नादुरूस्त बसही कारणीभूत असतात. त्यामुळे केवळ चालकांना दोष देवून चालणार नाही तर तांत्रिकदृष्ट्या होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.आगारनिहाय शिबिर घेवून चालक व वाहकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल यासाठी एसटीकडून प्रत्यन केले जातात. तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या चालक आणि वाहकांचा सन्मानही केला जातो. प्रवाशांची सुरक्षितरित्या ने-आण करणाऱ्या चालकांची १ जानेवारीपासून अल्कोहोल तपासणी कण्यात येत आहे. मात्र मशीनअभावी चालकांची नियमित तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. (नगर प्रतिनिधी)