लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमी, भंडाराच्या वतीने क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी येथील जंगल कामगार संस्थेच्या सभागृहात मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बळीराम उईके होते. अतिथी म्हणून प्रभूदास सोयाम, दामोदर नेवारे, माजी प्रा.पुरण लोणारे, डॉ.विनोद भोयर उपस्थित होते. संचालन जगदीश मडावी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी रमेशचंद्र सोमकुवर यांच्या माणूस नावाची कविता सादर करून करण्यात आली.आदिवासी अस्तित्व, अस्मिता अकादमीच्या वतीने प्रास्ताविक प्रा.डॉ.वामन शेळमाके, मांडतांना म्हणाले, ‘वंशविच्छेदनाच्या प्रक्रियेमुळे आदिवासी सकट मागासवर्गीय बहुजन समाजाला संपविण्याचे कार्य प्रस्थापित व्यवस्थेने केले आहे. याविरुद्ध बंड पुकारून जल, जंगल, जमीन चा प्रणेता युवा क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या आंदोलनाने ब्रिटीश घाबरले होते. स्वातंत्र्याचा प्रथम उलगुलान करणारा महामानव युवा क्रांतीजननायक त्यावेळी बिरसा मुंडा होता. बिरसा मुंडाच्या बलिदानातून सर्वहारा समाजाने प्रेरणा घेऊन, संघटीत होऊन, संघर्ष करावा लागेल हीच खरी श्रद्धांजली ठरेल’.यानिमित्ताने सुसंवाद करणारे जगदीश मडावी, चिंतामन इडपाते, तुळशीराम कोडापे, प्रा.विनोद मेश्राम, कवी रमेशचंद्र सोमकुवर, राजेश सलाम, नरेश कोडापे, दिनेश नागभिरे, वसंत सोमकुंवर इत्यादी मान्यवरांनी समयोचित विचारांची मांडणी करून माणसाला समानतेच्या धाग्याने बांधून समाजाची अस्मिता जपली पाहिजे, असा सूर व्यक्त केला.मुख्य अतिथी माजी प्राचार्य पूरण लोणारे म्हणाले, ‘मागासवर्गीय समाजाने संघटीत होवून लोकशाही मुल्याची जपणूक करणे काळाची गरज आहे’.अतिथी दामोदर नेवारे यांनी आदिवासी समाजात गोवारी जमात समाविष्ट असूनही न्याय का मिळत नाही? यासाठी लढा उभारून सर्वहास समाजाने संघटीत होवून संघर्षाची वाट तीव्र करावी लागेल. अन्यथा आपले अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी समाजाचे प्रभूदास सोयाम यांनी आदिवासीच्या अस्तित्व, अस्मितासाठी लढत राहणे ही आवश्यक बाब असून सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.बळीराम उईके म्हणाले, ‘आदिवासी समाजात एकजुट नाही, शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. मतभेद व एकजुट नसल्याने आदिवासी समाजाचे शोषण, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. बलिदान दिवसाच्या निमित्ताने सर्व मागासवर्गीय समाजाने आदिवासी समाजाला सहकार्य केले तर नक्कीच परिवर्तन होवून आदिवासींना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.
बिरसामुंडा समाजासाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:31 AM
बिरसा मुंडा हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी सेवक कवी, विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केले.
ठळक मुद्देवामन शेळमाके : बिरसा मुंडा बलिदान दिवस