शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेजलच्या संघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 12:22 AM

चवथीमध्ये दुर्धर आजाराने पितृछत्र हरविले तर दहावीत असताना कुटुंबाचा आधारवड असलेले वयोवृद्ध आजोबाही इहलोकी गेले.

लोकमत शुभवर्तमान : जिद्दीच्या बळावर खेचून आणले यशदिनेश भुरे। लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : चवथीमध्ये दुर्धर आजाराने पितृछत्र हरविले तर दहावीत असताना कुटुंबाचा आधारवड असलेले वयोवृद्ध आजोबाही इहलोकी गेले. घरात उरले ते विधवा आई व आजी, मोठी बहिण आणि पुरुष म्हणायला आठव्या वर्गात शिकणारा लहान भाऊ. ही गोष्ट आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत दहाव्या वर्गात ९५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या शहापूर येथील शेजल संदिप उके या गुणवंत विद्यार्थिनीची.अख्खं कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जगत असताना अगदी लहानपणी पितृछत्र हरविलेल्या शेजल नाऊमेद न होता केवळ जिद्दीच्या बळावर कोणताही शिकवणी वर्ग न लावता प्रचंड मेहनत व नियोजनबद्ध अभ्यासाने शेजलने हे यश मिळविले आहे. ती भंडारा जिल्ह्यात सीबीएसई शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या व दहावीच्या परीक्षेत सतत अव्वल ठरणाऱ्या उमरी (भंडारा) येथील महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे.आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या शेजलच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वडिलाने लावलेल्या व आता आई व आजी चालवत असणाऱ्या पोहा विक्री दुकानावर अवलंबून आहे. मात्र या दुकानाची सर्वात जास्त काळजी असते ती शेजलला. सकाळी चार वाजता उठून एक तास अभ्यास झाल्यानंतर ठीक पाच वाजता सात वाजतापर्यंत आजीला पोहा विक्रीच्या दुकानाची मांडणी करून देणे, पिण्याच्या पाण्याचा भरणा करणे हा तिचा नित्यक्रम. याच अवधीत आपल्या शाळेची तयारी केल्यानंतर आईने तयार केलेला जेवणाचा डब्बा घेऊन आजीच्या दुकानाजवळ बसची वाट बघत असताना दुकानातील कामे करणे हा तिचा नित्यक्रम. सुटीच्या दिवशी अधिक वेळ दुकानात देवून सुद्धा तिने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. दहावीत असल्याची चिंता दुकानातील कामे करताना तिच्या चेहऱ्यावर नसायची. तिची मोठी बहिण सुद्धा दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. ती सध्या रामटेक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. द्वितीय वर्षात शिकत आहे. लहान भाऊ आठव्या वर्गात आहे.सदर प्रतिनिधीने तिची भेट घेतली तेव्हा शेजलने आपल्या नियोजनबद्ध अभ्यासाची पद्धत सांगितली. आपल्या या यशात महर्षी विद्या मंदिरच्या प्राचार्या श्रुती ओहळे यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. तिच्यासोबत चर्चा सुरु असताना मात्र तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. अबोल चेहऱ्यानीच त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता शेजलने मिळविलेले नेत्रदिपक यश म्हणजे जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालण्याची किमया केली. तिच्या या कर्तृत्वाला सलाम.