डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही रुग्णांना तुमसरातील एका खासगी सिटी स्कॅन रुग्णालयात पाठवण्यात येते. परंतु त्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे रुग्णांकडून ३६०० रुपये घेतले जात आहेत.
गरिबांना हे परवडणारे नाही. एकच सिटी स्कॅन येथे असल्याने रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. रुग्णांच्या रांगा येथे दिसतात. गर्दीमुळे अनेक रुग्णांना भंडारा येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा मानसिक व आर्थिक मनःस्ताप होत आहे. तिथेही एक ते दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने विविध उपचारासाठी काही दर नेमून दिले आहे. परंतु तुमसर येथे शासनाच्या दरानुसार पैसे न घेता मनमर्जीने पैसे घेऊन गरीब वंचित रुग्णांची लूटमार थांबवून शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे सिटी स्कॅन मशीन लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनात तुमसरचे सामाजिक कार्यकर्ता जय डोंगरे यांनी केली आहे.