परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व रस्त्याची दुर्दशा होते. मागील सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता यांच्यासमवेत चालकांची गैरसोय होणाऱ्या स्थळांची मोक्यावर जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून दिली होती व सदर स्थळी दिशादर्शक फलक लावण्यासाठी सांगितले होते; मात्र सदर स्थळी अद्यापही दिशा निर्देश फलक लावण्यात आले नाही, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दखल घ्यावी. याबाबत शिवसेनेच्यावतीने उपकार्यकारी अभियंता विनोद चुऱ्हे यांना त्वरित फलक लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, वाहतूक सेनेचे दिनेश पांडे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, कृपाशंकर डहरवाल, शाखा प्रमुख निखिल कटारे, अरुण डांगरे सहसहायक अभियंता अंकुश चौधरी, व्ही. एम. सुतार उपस्थित होते.