शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘त्या’ महिलेला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश

By admin | Published: May 05, 2016 12:52 AM

नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आष्टी उपकेंद्रात गर्भवती महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.

प्रकरण गर्भवती महिलेच्या शस्त्रक्रियेचे : जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीने दिला निर्णय मोहन भोयर तुमसरनाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आष्टी उपकेंद्रात गर्भवती महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारीनंतर जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीपुढे या प्रकरणाची ३ मे रोजी चौकशी झाली. समितीने ३० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा झाली तर शासनाकडून ३० हजाराची नुकसान भरपाई देण्यात येते. या प्रकरणात गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे हा नियम लागू होत नाही, अशी भूमिका तक्रारकर्त्यांनी घेतला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आष्टी येथील श्यामकला भागवत गौपाले (२५) यांची आष्टी आरोग्य उपकेंद्रात २६ आॅगस्ट २०१५ ला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी श्यामकला यांची गर्भविषयक चाचणी निगेटिव्ह आल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. १० ते १२ दिल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले. तुमसर रूग्णालयात तपासणी केल्यावर त्या गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. २९ एप्रिल रोजी आष्टी येथील उपकेंद्रात श्यामकलाची प्रसुती झाली. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी ४ नंतर जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, भूलतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञांचा समावेश होता. या समितीपुढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी चौकशीचा अहवाल सादर केला. या समितीसमोर तुमसर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम.ए. कुरैशी, डॉ.वनश्री गिरीपुंजे व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. वैद्यकीय समितीने या प्रकरणात शासन नियमानुसार ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे येथे संबंधित डॉक्टरविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.शस्त्रक्रियेपूर्वीची गर्भधारणा तपासणी निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व कागदपत्रांचा सोपस्कार पार पाडण्यात येतो. चौकशी समितीने प्रत्येक बिंदूचा अभ्यास केला असून नियमानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिला आहे.- डॉ.विजय डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.या प्रकरणातील डॉक्टरावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. येथे गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणेचा नियम लागू होत नाही. आंदोलन उभारण्यात येईल.- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य, आष्टीस्वत: शस्त्रक्रिया केली व स्वत:चा चौकशीचा अहवाल स्वत:च तयार करून सभागृहासमोर सादर केला. ३० हजाराची नुकसानभरपाई देऊन तोंड बंद करण्याचा हा प्रकार खपवून घेणार नाही.- हिरालाल नागपुरे, गटनेता, पं.स. तुमसर.शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरकडेच चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडविकास अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. उच्चस्तरीय चौकशीची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे.- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती, पं.स. तुमसर.