शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

एक रुपयात विमा, तरी शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 3:50 PM

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : पीक विमा उतरविण्याची शेतकऱ्यांना मिळाली संधी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा उतरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नसल्याने आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची गर्दी झाल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अडचणी यायला लागल्या. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ फिरविल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना विमा उतरविण्याची संधी मिळाली आहे.

शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, तसेच पिकांना संरक्षण मिळावे, याकरिता शासनाने एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याकरिता १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्यात आल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता एकच गर्दी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यात अडचणी यायला लागल्याने शेतकऱ्यांनी अर्जच दाखल केले नाही. मुदतवाढीची मागणी केल्यावर शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

७९,२३३ शेतकऱ्यांनी भरला विमायावर्षी खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरविला आहे. विम्यासाठी अर्ज संख्या १,७९,१७८ इतकी आहे. ही संख्या १९ जुलैपर्यंतची असून, येत्या ३१ जुलैपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

८६,६५९ हेक्टरचा काढला विमाजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना संरक्षण मिळाले आहे. शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने विमा संरक्षित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

१,१८,०९६ शेतकऱ्यांनी भरला होता विमामागील वर्षी शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने १,१८,०९६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५११ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते.

विमा एक रुपयात, कागदपत्रासाठी चारशे रुपयांचा खर्चशासनाने एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे; पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्याकरिता किमान ४०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, गावात नेटवर्कच्या अडचणी कायम आहेत. त्यांना अर्ज भरण्याकरिता तालुक्याला जावे लागते.

का घटली शेतकऱ्यांची संख्या?पीकविमा उतरवूनही शेतकऱ्यांनी पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहेत. यामुळे शेतकरी यावर्षी पीकविमा उतरविण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.नुकतीच 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचे अर्ज भरण्याकरिता महिलांची सेतू केंद्रावर मोठी गर्दी असल्याने पीकविमा काढण्याचे अर्ज मागे पडले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी म्हणतात..."शासनाने पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पीकविमा उतरविण्याकरिता सुरुवातीला १५ जुलैपर्यंतची मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना सुरू झाल्याने सेतू केंद्रावर अर्ज भरण्याकरिता गर्दी झाली होती. शेतकऱ्यांना अर्जासाठी संधीच मिळत नव्हती."- महादेव फुसे, शेतकरी.

"यावर्षी विविध योजनांचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीकविमा उतरविण्याकडे दुर्लक्ष झाले होते. मागील वर्षी पीकविमा उतरविला होता; परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत योजनेसंबंधी नाराजी आहे."- सुरेंद्र बागडे, शेतकरी.

"सध्या जिल्ह्यात ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून अर्जाची संख्या १,७९,१७८ इतकी आहे. आतापर्यंत ८६ हजार ६५९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. मुदतवाढीमुळे यात आणखी वाढ होणार आहे. यापूर्वी योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. आता शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गतवर्षी इतकी नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत."- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडारा