मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असून तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथील आंतरराज्यीय सीमा नागपुर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान खुल्या आहेत. वाराशिवनी, बालाघाट येथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी होती. एका तंबुत पोलीस कर्मचारी होते. सध्या येथे केवळ वनविभागाची चौकी आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती, हे विशेष.तुमसर तालुक्यातील बपेरा येथे आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी तीन वर्षापुर्वी मंजूर करण्यात आली होती. पोलीस कर्मचारी एका तंबुत राहून कर्तव्य पालन करीत होते. चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. सदर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा मुख्यालयातून केली जात होती. पक्क्या पोली चौकी बांधकाम अजूनपर्यंत करण्यात आली नाही. तात्पूरत्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी एका झाडाखाली कापडी तंबूत राहत होते. प्काही दिवसापासून येथील चौकी (तंबु) हटविण्यात आला. सध्या येथे रस्त्यावर केवळ बेरीकेट्स लावले आहेत. हा आंतरराज्यीय मार्ग मोठा वर्दळीचा असून वाराशिवानी, बालाघाट असा हा आंतराज्यीय महामार्ग आहे. वैनगंगा नदीपलीकडे मध्यप्रदेशाच्या सीमा प्रारंभ होतात. भंडारा जिल्ह्याच्या येथे सीमा समाप्त होते. तीन वर्षापुर्वी स्थानिक नागरिकांनी कायम पोलीस चौकीची मागणी केली होती. तेव्हा ती मंजूर करण्यात आली होती. परंतु त्यानंतर येथे काहीच झाले नाही. राज्याच्या गृहविभाग इतका असंवेदनशिल आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाने ०.२६ हेक्टर आर. जमिन पोलीस चौकी बांधकामाकरिता मंजूर केली. १५ लक्ष रुपयांचा निधी शासनाने मंजूर केल्याची माहिती आहे. पंरतु प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अजूनपर्यंत करण्यात आले नाही.अस्थायी कापडी तंबुतील कर्तव्य बजावणाºया पोलिसांच्या जीव येथे धोक्यात आला होता. जंगलव्याप्त परिसर असल्याने सरपटणारे प्राणी, जंगली श्वापदांचा वावर या परिसरात आहे.सध्या नागपूर येथे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथे आंतरराज्यीय सीमा आहे. दोन्ही ठिकाणी पोलीस चौकी नाहीत. सातपूडा पर्वत रांगा असल्याने हा परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. या जंगलातून रामटेक मार्गे नागपूरला सहज जाता येते. काही दिवसापूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्याकडून धमकी मिळाली होती. एक विशेष खबरदारी म्हणून किमान अधिवेशनादरम्यान आंतरराज्यीय सीमेवार पोलीस बंदोबस्त करण्याची गरज आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा बाबीकडे येथे दुर्लक्ष होतांनी दिसत आहे. आंतरराज्यीय सीमेवार पोलीस बंदोबस्त करण्याचा नियम आहे हे विशेष.आंतराज्यीय सीमा सताड उघड्या आहेत. राज्याच्या गृहविभाग येथे सतर्क दिसत नाही. कायमस्वरुपी व बाराही महिने पोलीस चौकी येथे तयार करण्याची गरज आहे. नियमबाह्य कामे चालू ठेवण्याकरिता पोलीस चौकी हटविण्यात आली असावी.- डॉ. पंकज कारेमोरे,युवा काँग्रेस नेते तुमसर
‘त्या’ आंतरराज्यीय सीमा मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:14 PM
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असून तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथील आंतरराज्यीय सीमा नागपुर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान खुल्या आहेत. वाराशिवनी, बालाघाट येथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी होती. एका तंबुत पोलीस कर्मचारी होते.
ठळक मुद्देमहाराष्ट्र मध्य प्रदेशाच्या सीमा : बपेरा-नाकाडोंगरी येथे पोलीस चौकी नाही