कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नंदागवळी तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य एन. पी. सांगाडे, माजी प्राचार्य डॉ. अनिल कोसमकर उपस्थित होते. प्रा. एन. पी. सिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना साक्षरता दिनाविषयी विस्तृत माहिती दिली. प्राचार्य संजय नंदागवळी यांनी साक्षरता दिनाचे महत्त्व व डिजिटल शिक्षण प्रणाली या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. नाना जाधव यांनी तर संचालन व आभार प्रा. विलास मेश्राम यांनी केले. कार्यक्रमात प्रा. स्वाती शंभरकर, प्रा. मंगेश वहाणे, प्रा. शरद गजभिये, प्रा. रमेश नगराळे, प्रा. भगवंत शोभणे, प्रा. माणिक लोथे, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
100921\img-20210909-wa0026.jpg
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मार्गदर्शन करताना