२९ लोक ०३ के
विशाल रणदिवे
अडयाळ : निलज ते कारधा या एकूण ५५ किलोमीटर अंतराचे महामार्गाचे जेव्हापासून काम सुरू झाले तेव्हापासून ते आजपर्यंत असे एकही गाव नसेल की या बांधकामामुळे ग्रामस्थ, प्रवाशांना व वाहनचालकांना त्रास झाला नसेल. फक्त एकाच वर्षात तर रस्त्यावर ठिकठिकाणांवरून भेगा पडल्या असतील व रस्त्याच्या कडेतील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली.
पहिल्याच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात माती वाहून जाऊन तिथेसुध्दा धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. ग्रामस्थ आणि कंत्राटदार आमने-सामने आले तेव्हा कंत्राटदाराने उपाययोजना केली. हे सत्य असले तरी घडत असलेला जो प्रकार आहे हा उत्कृष्ट बांधकामाचा प्रकार आहे का ? असाही सवाल उपस्थित होत आहे.
अडयाळ ते नेरला या अंतरावरील महामार्गाचे बांधकाम तर झाले. रस्ते उंच उंच झाले आहेत. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडा आणि रस्त्यावर सुद्धा भेगा पडल्या आहेत. याला जबाबदार कोण आहेत. रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. एकाच वर्षात असा प्रकार घडणे, म्हणजे गंभीर बाब आहे.
रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा रस्ते उंच असल्याने एखादे वाहन अनियंत्रित झाले तर निश्चितच अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. याकडे तत्काळ संबंधित अधिकारी तथा विभाग यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे
बॉक्स
रस्ता बांधकाम उद्दिष्ट वेळेपूर्वी अशक्य
पवनी ते निलज रस्ता बांधकामाचे उद्दिष्ट वेळेपूर्वी पूर्ण होणे, ही बाब अशक्य ठरली आहे. सुरुवातीपासूनच बांधकाम हळूहळू होत आहे. त्यातच कोरोना महामारीने बांधकामावर अजून अवकळा आणली. बांधकाम सुरू झाले तेव्हा धुळीमुळे गावातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. लोकाभिमुख कार्यासाठी नागरिकांनी साथही दिली. वारंवार मागणी केल्यावर रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जायची. आधीच लहानमोठे अपघात सातत्याने घडायचे. यात या बांधकामामुळे अधिकच भर पडली. अपेक्षेप्रमाणे बांधकाम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. राजकीय मलाई लाटणे लोकनेत्यांच्या हस्तक्षेपाने बांधकामाचा ताल बिघडला. याचा सर्वस्वी भुर्दंड या मार्गावरील ग्रामस्थांना बसला.