लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.बघेडासह चिखली व नदी काठावरील गावात भीषण जलसंकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत २० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणाच्या मृत साठ्यातून पाणी विसर्ग करण्याची मागणी पंचकोशीत जोर धरू लागली आहे.आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर धरणावरच तुमसर तालुका व मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावांची भिस्त आहे. यापूर्वी या धरणातून रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर येथे उच्च स्तरीय बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत पाण्याचा २० दलघमी विसर्ग करण्यात आला. यात तालुक्यातील तुमसर शहरासह अनेक गावांची तृष्णा भागविण्यास मदत झाली. बघेडा, कारली जलाशय बानथडी नदीतून वैनगंगा पात्रातही पाणी धरणातून पोहोचले.सध्या सुर्य आग ओकत आहेत. धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे मोठ्या प्रमाणात बास्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणात केवळ मृतसाठा उपलब्ध आहे. मृतसाठ्यातून केवळ पिण्याच्या पाण्याकरीताच धरणातच विसर्ग करण्याचा नियम आहे. तालुक्यातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. तलावाने तळ गाठायला सुरूवात केली आहे. सदर जलाशयात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे. बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील अनेक गावात सध्या भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. मानवासोबतच गुरे ढोरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आह.े गाव खेड्यात पहाटेपासून पाण्याकरिता वणवन भटकावे लागत आहे. मागील ४५ वर्षात इतकी भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे, असे गावातील वयोवृृद्ध सांगत आहेत.गर्रा बघेडासह तालुक्यात भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडी धरणातून मृतसाठ्यातून किमान पिण्याकरिता पाण्याचा विसर्ग करावे. बघेडा जलाशय व इतर जलाशयात पाणी तात्काळ सोडून समस्या दूर करावी. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.-सुरेश रहांगडाले, माजी जि.प. सदस्य तुमसर.
आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:05 AM
वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देबघेडा जलाशय मोजतो अखेरची घटका : नदी काठावरील गावात भीषण जलसंकट