शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

मानव धर्माच्या सेवकाला मिळते दैवी शक्तीचा परिचय

By admin | Published: February 01, 2016 12:44 AM

मानवाला चांगल्या विचाराची गरज आहे. परमार्थाकडे लक्ष असावे. समाधान बाजारात मिळत नाही. मानव चांगल्या कर्तृत्वातून जिंकत असतो.

मोहाडीत सेवक संमेलन : लता बुरडे यांचे प्रतिपादन, बाबा जुमदेवजींच्या जयघोषाने दुमदुमली मोहाडी नगरीमोहाडी : मानवाला चांगल्या विचाराची गरज आहे. परमार्थाकडे लक्ष असावे. समाधान बाजारात मिळत नाही. मानव चांगल्या कर्तृत्वातून जिंकत असतो. मानव लोभी आहे. अहंकारात तो विसरत असतो. महिला देवीपेक्षाही कमजोर नाहीत. देव हृदयात असतो. अंधश्रद्धा वाईट विचारात असते. भक्ती, शक्ती, युक्ती असे भगवत कार्य करा. दैवी शक्ती दिसत नाही. दैवी शक्तीचा परिचय मानव धर्माच्याच सेवकाला मिळतो, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनी उद्घाटनप्रसंगी केले.बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने परमात्मा एक सांस्कृतिक भवन मोहाडी येथे सेवक संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले होते. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, नगरपंचायत अध्यक्ष स्वाती निमजे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, आशिष पात्रे, महादेव बुरडे, अ‍ॅड.गुल्हाणे, विजय चाचीरे, भजनलाल पधा, पांडूरंग वंजारी, किशोर चौधरी, बंडू आसुटकर, मनिषा साठवणे, संतोष भुरे, नगरसेविका सायत्रा पारधी, मंडळाचे उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, राजू पिल्लारे, नत्थू कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजू माटे, गुरुदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे, शोभा भुरे, नरेश ईश्वरकर आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन म्हणाले, व्यसनमुक्तीचे काम परमात्मा एक सेवक मंडळाकडून देशासाठी होत आहे. संमेलनातून सेवक व्यसनमुक्तीचे प्रण घेऊन जातात. मंडळाचे काम देशाला मजबूत करण्यासाठी करीत आहेत. मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले म्हणाले, ग्रंथाचा उपयोग मानवाच्या विकासासाठी होतो. कोणतेही दु:ख दूर करण्यासाठी शक्ती मानव धर्माच्या कार्यात आहे. सत्य, मर्यादा व प्रेम या तत्वाचे पालन काटेकोरपणे सेवकांनी करावे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी संतोष भुरे, वसंता उरकुडे, योगेश वाडीभस्मे आदींनी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीवर सेवकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून मंडळाचे सचिव मोरेश्वर सार्वे यांनी मंडळाच्या कार्याची प्रगती विषद केली. यावर्षीपासून बाबा जुमदेवजी स्वच्छता अभियान कार्यक्रम गावागावातून राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मोहाडी नगरातून व्यसनमुक्ती व बाबा जुमदेव यांच्या जीवनावर झांकीसह रॅली काढण्यात आली. एकूण दहा झांकीचा समावेश होता. झांकीचा प्रथम पुरस्कार रामरतन नागफासे, दुसरा गौरव पोटभरे, तिसरा परमपूज्य सेवक मंडळ खापा, चौथा जैराम देशमुख, पाचवा देवचंद सेलोकर व सहावा पुरस्कार अमोल भालाधरे यांच्या झांकीला देण्यात आला. सकाळपासून स्वयंप्रेरणेने सेवक मंडळी मिळेल त्या वाहनाने मोहाडी येथे येत होत. बरेच सेवक मंडळी पायी चालून आले होते. मोहाडीच्या प्रत्येक रस्ता सेवकांच्या गर्दीने फुलला होता. संमेलनस्थळी भक्तांच्या आतील व बाहेर बसायला जागा शिल्लक नव्हती. अनेक सेवकांना बाहेरून बाबांचा जयघोष करावा लागत होता. मोहाडीला यात्रेसारखे स्वरुप आले होते. यावेळी जिल्ह्यातील प्रथम सेवक रघू पिल्लारे, लक्ष्मण डहारे, विलास बुधे, प्रभूदास पडारे, किसन डेकाटे, बळीराम सव्वालाखे, शंकर बिरणवारे, हिरालाल उपरीकर, सहादेव कातोरे, वनराज बुधे, सायत्रा थोटे, लक्ष्मी डेकाटे आदींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन इंद्रपाल मते, तृप्ती दिवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष कंठीराम पडारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास भगवान पिल्लारे, श्रीकृष्ण झंझाड, लक्ष्मण माहुले, युवा संघटना, सेवकांनी मदत केली. (तालुका प्रतिनिधी)