लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघातर्फे जाहिर निषेध करण्यात आला आहे.राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सोलापूर येथे मराठा समाजाचा आरक्षणासंबंधाने आलेल्या मागासवर्गीय आयोगासमोर निवेदन देण्यासाठी गेले असता त्यावेळी मराठा समाजाच्या व संभाजी ब्रिगेडच्या काही समाजकंटकांनी काळे फासून धक्काबुक्की केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण न देता स्वतंत्रपणे द्यावे, अशी भूमिका शंकरराव लिंगे यांनी माळी महासंघाच्या 'लेटरपॅड'वर निवेदन मागासवर्गीय आयोगाकडे दिले होते. त्याच्यावर विरोध करणाºया समाजकंटकांनी हल्ला केला व त्यांचे कपडे फाडले आणि काळे फासले हा प्रकार निंदनिय आहे. यापूर्वी सुध्दा ओबीसींना निवेदन देण्यापासून रोखण्याचे प्राकर घडलेले आहेत. अशा प्रकारच्या जनसुनावणी पारदर्शी व निष्पक्ष होणे गरजेचे आहे. ओबीसी समाजाला संविधानिक बाजू मांडण्याचा हक्क असूनही अटकाव केला जात आहे. या घटनेतील आरोपींविरोधात कारवाई करण्यात यावी, ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे. अन्यथा ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ व ओबीसी विद्यार्थी संघ यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळात गोपाल सेलोकर, भैयाजी लांबट, गोपाल देशमुख, धनराज झंझाड, मनोज बोरकर, इश्वर नाकाडे आदींचा समावेश आहे.
लिंगे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:02 PM
ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघातर्फे जाहिर निषेध करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : ओबीसी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन