साकोली : साकोली पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परसोडी येथे गत सहा महिन्यापूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि पावसाळ्यात रस्ता खराब झाल्यामुळे जाता-येता वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व अंदाजपत्रकानुसार साहित्य न वापरल्याने रस्ता अल्पावधीतच फुटलेला आहे. या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परसोडीवासीयांनी केली आहे.
नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून परसोडी येथील भाजीपाले राईस मिल ते परसोडीच्या चौकापर्यंत लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून शासनाने रस्ता तयार करण्याचे काम एका एजन्सीला दिले होते. त्या एजन्सीमार्फत हा रस्ता सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आला. मात्र निकृष्ट साहित्य वापरून कंत्राटदाराने हा रस्ता खराब अवस्थेत तयार केलेला आहे. अल्पावधीतच हा रस्ता फुटलेला असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. या प्रकरणाची योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.
बॉक्स
अपघाताची शक्यता
शासन जनतेच्या सुख सुविधांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करीत असतो. मात्र बांधकाम विभाग व कंत्राटदार आपल्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व जनतेच्या जीवाशी खेळत असतात. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर रस्त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आलेले आहेत याची योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.