लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण देता येणार नाही, या निर्णयाने अडचणीत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल राजू उईके यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव आणणाऱ्या संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर उईके यांच्या आत्महत्येप्र्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आॅर्गनाईझेशन फॉर राईट्स आॅफ ह्यूमन (आफ्रोह) संघटनेने केली आहे.आफ्रोह संघटनेच्यावतीने उईके यांच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन उभे करण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णय प्रसिध्द करुन ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचा अधिसंख्य पदावर टाकण्याच्या निर्णय घेतला होता. यात शासन निर्णयाच्या धसक्यानेच त्यांनी पोलीस ठाण्यातच कर्तव्यावर असताना पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली.राजू उईके यांच्यासारख्या हजारो कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याने अधिसंख्य पदावर टाकण्याच्या भीतीपोटी न्यायालयाचा मार्ग अवलंबिला आहे. यासंदर्भात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही आफ्रोह संघटनेने केली आहे.तसेच न्यायालयाला खोटी माहिती सादर करणाऱ्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आफ्रोह संघटनेच्या वतीने राज्य पातळीवर हा मुद्दा उचलून धरला आहे. एकाच दिवशी १७ जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दिवंगत राजू उईके यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दयावा अशी मागणीही करण्यात आलेली आहे.निवेदन देताना मंगेश नंदनवार, सुरेश धकाते, नितीन धकाते, जे. टी. कुंभारे, मनोहर हेडावू, महेंद्र बारापात्रे, रामधन धकाते, घनश्याम पराते, नरेंद्र कोहाड, प्रविण खडगी, श्रीकांत खडगी, फत्तु सोनकुसरे, कुंडलिक धकाते, देवचंद नंदनवार, गोवर्धन पिपरे, बाळकृष्ण धकाते, सुरेखा सोनकुसरे, कांचनमाला निमजे, लीला खेताडे, पुनाजी निमजे, दिनेश नंदनवार, व्ही. जे. गौतम, अनिल निनावे, महादेव निनावे, माधवराव धकाते, दुमोद धकाते, एस. एम. हेडाऊ, डी. टी. नंदनवार, आर. डी. नंदनवार, आर. एम. हेडावु, सी.जी. कोहाडे आदी उपस्थित होते.
‘त्या’ आत्महत्येची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:00 AM
आफ्रोह संघटनेच्यावतीने उईके यांच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन उभे करण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णय प्रसिध्द करुन ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कर्मचाºयांना ११ महिन्यांचा अधिसंख्य पदावर टाकण्याच्या निर्णय घेतला होता.
ठळक मुद्देआफ्रोह संघटनेची मागणी : यवतमाळ येथील पोलिसाचे आत्महत्या प्रकरण