शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

वाघांच्या शिकारीचा तपास संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:54 IST

तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनाकाडोंगरी वनपरिक्षेत्र। मध्य प्रदेशातून पथक रिकाम्या हाताने परतले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दोन आठवड्यापुर्वी रानडुकराच्या शिकारीतून वाघाच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले. स्थानिक शिकाऱ्यांना वनविभागाने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तीन वाघ, दोन बिबटांची शिकार केल्याची कबुली दिली. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली. वनविभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. स्थानिक शिकाºयाकडून मिळालेल्या माहितीवरुन वनविभागाचे पथक मध्यप्रदेशात गेले. त्याठिकाणी या पथकाने शिकार प्रकरणाच्या मोरक्याचा शोध घेतला. परंतु मोरक्या हाती लागला नाही. अखेर वनविभागाचे पथक रिकाम्या हातानेच परत आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाचा तपासातही अपेक्षित यश हाती आले नाही. तीन वाघांची शिकार झाल्याचे पुढे आल्यानंतरही हवा तसा तपास होताना दिसत नाही. दरम्यान वनविभाग स्थानिक शिकाºयांचीच कसून चौकशी करीत असून ठोस काहीही हाती लागले नाही. या शिकाºयांनी शिकार केलेल्या वाघांचे अवयव नेमके कुठे ठेवले, कुणाला विकले यात कोणत्या टोळीचा समावेश आहे याची माहिती अद्यापही पुढे आली नाही. भंडारा जिल्ह्यातील पवनी कºहांडला अभयारण्यात तीन महिन्यापूर्वी दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ते प्रकरणही सध्या थंडबस्त्यात आहे. आता पुन्हा तीन वाघाचा शिकारीचे प्रकरण पुढे आले. मात्र हा तपासही अतिशय संथगतीने होत आहे.भंडारा जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. परंतु पुरेशा सुरक्षेअभावी वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. जंगलालगत असलेल्या गाव कुसात वन्यप्राणी शिरतात. त्यावेळी त्यांना पिटाळून लावताना वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. वन विभागाने या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात शिकारीच्या संख्येत वाढ होत असताना वनविभाग मात्र शासकीय सोपस्कार पार पाडण्यात गुंतलेली असते.वन्यजीवांची सुरक्षा वाऱ्यावरभंडारा जिल्ह्यातील अभयारण्यांमध्ये हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार नेहमी पुढे येतात. आता तर तीन वाघ आणि दोन बिबट्याच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले. यावरुन जंगलातील वन्यजीवांची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येते. वनविभागाचे पथक नेमकी गस्त कशी घालतात हा संशोधनाचा विषय आहे. वाघाच्या शिकारीचे प्रकरणी अपघाताने पुढे आले. रानडुकरांची शिकार माहित झाली नसती तर वाघाचा शिकारीचे प्रकरणही पुढे आले नसते.

टॅग्स :Tigerवाघ