लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मंगळवारला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद झाली. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत ४० उद्योग घटकांसाठी ४५२.१५ कोटींचे सामंजस्य करार झाले. यातून ११०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाने सांगितले.
या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, सहसंचालक उद्योग गजेंद्र भारती, मेटल असोसिएशनचे अध्यक्ष पंकज सारडा, पोस्ट विभागाचे गजेंद्र लोथे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमंत बदर, उपव्यवस्थापक गोंडचवर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास सुधाकर झळके उपस्थित होते.
नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार, व्यावसायिकांना एकत्र आणून भंडारा हा विकासासाठी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश असल्याचे बदर यांनी यावेळी सांगितले.
गुंतवणूक, उद्योग वाढीचा हेतूगुंतवणूक परिषदेच्या आयोजनाची भूमिका सहसंचालक गजेंद्र भारती यांनी स्पष्ट केली. नागपूर विभागात प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक परिषद झाली असून, त्याद्वारे त्या त्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक निर्माण करणे, उद्योगात वाढ करणे यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रक्रिया उद्योगावर दिला भरजिल्ह्यात उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. तरुण उद्योजकांनी कठोर मेहनतीची तयारी ठेवावी. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी पर्यटन, कृषी, यासह धानावर प्रक्रीया उद्योगावर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेतून प्रकाश टाकला.
विविध उद्योगांबाबत सामंजस्य करार
- जिल्ह्यातील विविध उद्योगांबाबत सामंजस्य करार उद्योग कंपन्यांशी करण्यात आले. त्यामध्ये व्हीएनना डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (जांब, ता. मोहाडी) यांच्यासोबत १०० कोटीचा सामंजस्य करार करण्यात आला.
- सोबतच जिल्ह्यातील इलेक्ट्रोड व्यवसाय राईस मिल ऍग्रो इंडस्ट्रीज आणि मेटल उद्योगाशी संबंधित अनेक सामंजस्य करार झाले. यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या, मंजुरी आणि सेवा कालमर्यादित देण्याच्या दृष्टीने कायद्याद्वारे गुंतवणूकदार सुविधा केंद्र, गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी म्हणून एक खिडकी प्रणालीला अधिकार देण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
- जिल्हयात अगरबत्ती, सिल्क तसेच शिंगाडा, रेशीम यावर आधारीत उदयोगांचे क्लस्टर निर्माण होत असल्याचे सांगितले. नव्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळणार आहे.
१०० कोटींचा सामंजस्य करार व्हीएनना डेअरीसोबतजिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगाबाबतीतले सामंजस्य उद्योग कंपन्यांशी करण्यात आले. असाच एक १०० कोटींचा करार व्हीएनना डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड जांब ता. मोहाडी यांच्याशी झाला.