लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावर प्रवेश करताना एका टोकावर खड्डा पडला आहे. जड वाहनाला येथे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर खड्डा पुलावर पोकळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने याची खातरजमा करण्याची गरज आहे.तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्ग ३५६ वर पवनारा शिवारात मागील उन्हाळयात पुल रहदारीकरीता खुला करण्यात आला. पुलावर प्रवेश करतांनी एका बाजूला कठडयाजवळ खड्डा पडला आहे. खड्डयाजवळील जागा पोकळ वाटत असून दबल्यासारखी दिसत आहे. सदर रस्ता आंतरराज्यीय असून जड वाहने मॅग्नीजचे ट्रक, कोळशा तथा इतर साहित्य वाहून नेणारी वाहनेची संख्या मोठी आहे. खड्डा केवळ पूलावर आहे की तो खाली पोकळ आहे यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.एका नाल्यावर उंच असा हा पूल आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांचे लक्ष हा खड्डा वेधून घेत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर खड्डयाची खातरजमा करण्याची गरज आहे. सदर खड्डा बुजवून पुल समतल करण्याची मागणी माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.जुन्या पुलाकडे जाणारा मार्ग धोकादायकनवीन पुलाजवळील जुने पूल भुईसपाट करण्यात आले. परंतु जुन्या पुलाकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते माती टाकून बंद करण्यात आले. वाहनधारकांना येथे संभ्रम निर्माण होत आहे. किमान उंच बॅरीकेट्स येथे लावून रस्ता बंद करावा, नाही तर संपूर्ण रस्ता भुईसपाट करावा, अशी मागणी दिलीप सोनवाने यांनी केली आहे.
पुलावरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:31 PM
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावर प्रवेश करताना एका टोकावर खड्डा पडला आहे. जड वाहनाला येथे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर खड्डा पुलावर पोकळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने याची खातरजमा करण्याची गरज आहे.
ठळक मुद्देतुमसर-कटंगी मार्गावरील पवनारा पूल : बांधकाम विभागाने तपासणी करण्याची मागणी