भंडारा : कृषि व पदुम विभागाच्या १६ जुलै व ३० जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे. दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांना कृषि विषयक योजनांचा लाभ देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कृषि विभाग जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅक्टोंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा.सदर योजनेत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीकरीता १ लाख रुपयांपर्यत तसेच विहिरी ऐवजी पंपसंच, पाईप लाईन, बैलजोडी, बैलगाडी, सुधारीत शेती औजारे, निविष्ठा इत्यादी बाबी घ्यायच्या असल्यास ५० हजार रुपयांपर्यत अनुदान देय आहे. यापेक्षा जास्त खर्च आल्यास शेतकऱ्यांचा लाभार्थी हिस्सा म्हणून राहील. पंचायत समितीकडून प्राप्त प्रस्तावाच्या छाननी नंतर जिल्हा निवड समितीकडून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.पात्रतेच्या अटी या प्रमाणे आहे. शेतकऱ्यांजवळ त्यांच्या स्वत:चे नावे ६ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी. जमीन धारणेचा दाखला सात-बारा व ८-अ मध्ये घेण्यात यावा. सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडण्यात यावा. अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांच्या बाबतीत ५० हजारचे आत असलेल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडावा. शेतकऱ्यांने त्याच योजनेत या आधी लाभ घेतलेला नसावा. शेतकऱ्याने विहित नमुन्यात प्रस्ताव सर्व दाखल्यासह पंचायत समितीच्या कृषि विभागास सादर करावा. योजनेंतर्गत ५ आॅक्टोंबरपर्यंत प्रस्ताव पंचायत समिती मार्फत स्विकारण्यात येतील. अधिक माहितीकरीता पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)
अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित
By admin | Published: September 29, 2016 12:40 AM