लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाºयाने कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे, दोन कोटीच्या उद्यानात अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली. याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांनी अहवाल मागून गुरुवारी दुपारला मोका चौकशी करून पाहणी केली.तुमसर तालुक्यातील सामाजिक वनीकरणाची कामे बोगस आढळून येत असून औषधाचे बोगस बील, फलकावर अंदाजपत्रकीय किंमत टाकली नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालयी राहत नाही. डोंगरला येथे स्व.उत्तमराव पाटील उद्यानात अनेक कामात अनियमितता दिसून येत आहे. २४ हेक्टर परिसरात हे उद्यान असून आ.वाघमारे गुरुवारी दुपारी येत आहेत अशी माहिती मिळताच उद्यानात सकाळपासून वृक्ष लावायला सुरुवात केली. वनमजूर म्हणून स्थानिक मजूरांना प्राधान्य देणे गरजेचे असताना बाहेरगावचे मजूर येथे कामावर ठेवण्यात आले. उद्यानात प्रवेश करताच दुतर्फा असलेल्या नालीतील मुरुम रस्त्यावर घालण्यात आले असून ही नाली अपघाताला आमंत्रण देणारी आहे. उद्यानात दुसºया बाजुला उद्यान पूर्णत्वास आले नसताना लहान मुलांकरिता खेळण्याची साहित्य लावण्यात आली. ती सध्या भंगारात जाण्याच्या मार्गावर आहे. प्रत्यक्षात उद्यानासारखी स्थिती येथे दिसत नाही. राज्याच्या वनमंत्रालयाने या उद्यानाकरिता दोन कोटींचा निधी मंजूर केला असून टप्प्याटप्प्याने निधी देत आहे. या उद्यानात स्थानिक नागरीक व परिसरातील नागरिक जात नाही. उद्यानाच्या नावावर शासनाचा निधी खर्च करणे सुरु आहे.राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा येथे फज्जा उडाला आहे. शासनाची येथे अक्षरश: दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कामांची चौकशी करुन दोषी अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वनमंत्र्याकडे करणार असल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले. सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एफ. एम. राठोड व संबंधित खात्याचे उपसंचालक योगेश वाघाये यांनाही आ.वाघमारे यांनी खडसावले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर, बाजार समितीचे संचालक राजेश पटले, डोंगरल्याचे सरपंच उमेश बघेले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.डोंगरला येथील प्रकरणात स्वत: लक्ष घालत असून निधीत अनियमितता आढळली तर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असून दोषी अधिकाºयांची गय केली जाणार नाही.आ. चरण वाघमारे, तुसमरसामाजिक वनीकरण, डोंगरला येथील कामात अनियमितता प्रकरणी चौकशी सुरु असून दोषी अधिकाºयांवर कारवाईची शिफारस वरिष्ठ अधिकाºयांकडे करण्यात येईल.योगेश वाघाये, उपसंचालक, सामाजिक वनीकरण भंडारा
उद्यानाच्या कामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:21 AM
तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाºयाने कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे, दोन कोटीच्या उद्यानात अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली.
ठळक मुद्देवृक्ष लागवडीचा फज्जा : पावसाळ्यातील वृक्ष लावले आता