दहा वर्षांपासून ठाणा राष्ट्रीय महामार्गालगत आयुध निर्माणी पतसंस्थाद्वारा चालविण्यात येणाऱ्या भारत पेट्रोलपंप परिसरात पेट्रोलपंपाचे बांधकाम रेंगाळलेल्या स्थितीत होते. लोकमतने येथील समस्याविषयी वारंवार आपल्या दैनिकात बातमी प्रसारित केली. सदर लोकमतची दखल घेत मागील आठवड्यापासून सुरुवात कामाला करण्यात आली. यात छताचे काम व परिसरात गट्टू लावण्याचे व बगीच्या बनविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र गट्टू लावण्यामध्ये काळी चुरीऐवजी रेतीचा वापर केला गेला. परिणामी पेट्रोल भरणाऱ्या दोन मशिनीदरम्यान गट्टू लावलेल्या ठिकाणी खड्डा पडला. परिणामी सदर काम हे निकृष्ट अनियमितता असल्याचे आढळून येत आहे. याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. याबाबत आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्था अध्यक्षांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
गट्टू लावण्याच्या कामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:24 AM