शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:45 AM

तुमसर तालुक्यातील हरदोली (आं) येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांतर्गत रस्त्याच्या कामावर मुरुम खननाची परवानगी दावेझरी घेतली. परंतु प्रत्यक्षात हरदोली येथील झुडपी जंगल परिसरातून जेसीबीने ८१५ ब्रास मुरुम खनन करण्यात आले.

ठळक मुद्देहरदोली येथील प्रकार : यंत्राने केली कामे, झुडपी जंगलातून मुरुम खनन

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील हरदोली (आं) येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांतर्गत रस्त्याच्या कामावर मुरुम खननाची परवानगी दावेझरी घेतली. परंतु प्रत्यक्षात हरदोली येथील झुडपी जंगल परिसरातून जेसीबीने ८१५ ब्रास मुरुम खनन करण्यात आले. मुरुम ट्रॅक्टरने पसरविण्यात आला. याप्रकरणाची तक्रार माजी सरपंच रविदयाल पटले यांनी खंड विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.हरदोली (आं) येथे मग्रारोहमी योजनेंतर्गत पाच रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले. त्या रस्त्यावर मुरुम घालण्याकरिता मौजा दावेझरी येथील गटक्रमांक २५१/२ ची ८१५ ब्रास मुरुम काढण्याची परवानगी तुमसर तहसीलदारांकडून आदेश क्रमांक २७९, २८०, २८३ एमएमएल ३०-२०१६-२०१७ नुसार घेण्यात आली. परंतू वरील जागेतून मुरुम खनन न करता मौजा हरदोली येथील गट क्रमांक २५२ झुडपी जंगल परिसरातून सुमारे ८१५ ब्रास जेसीबीने काढण्यात आले. हे मुरुम ट्रॅक्टरच्या मदतीने रस्त्यावर पसरविण्यात आले. यामुळे मजुरांना खोदकाम व मुरुम पसरविण्याच्या कामापासून वंचित ठेवले. नियमानुसार मग्रारोहयोची कामे मजुरांकडून करण्याचे शासनाचे आदेश आहे. त्यांना डावलून येथे कामे करण्यात आली. एम.बी. रेकॉर्ड करताना दावेझरी ते हरदोली ६ कि.मी. चे अंतर दाखविले तथा मजुरांना खोटे मस्टर तयार केल्याची शक्यता आहे. हरदोली येथे लाभार्थ्यांना दुसºयांदा घरकुल देण्यात आले असून शासकीय व माझ्या स्वत:च्या जागेत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. याची लेखी तक्रार दिली आहे. अद्यापपर्यंत येथे चौकशी व कारवाई झाली नाही. ग्रा.पं. नमुना आठ मध्ये कुणाला घरकुल मिळाले आहे व कुणाचे घर शासकीय जागेत आहे याची नोंद आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरातील ४२ लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी १२ हजारांचा लाभ दिला आहे. येथे सर्रास नियमांचा उल्लंघन करून संबंधितांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच रवीदयाल पटले यांनी केली आहे. सदर तक्रारीची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, भंडारा यांचेकडेही करण्यात आली आहे.