संजय मते।लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देऊन तसे आदेश कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांची नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकींग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी सालई खुर्द येथील नागरिकांनी केली आहे.नळयोजनाचे काम सुरु करण्यापूर्वी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रतिनिधी व इतर पदाधिकाºयाला माहिती न कळविता आपल्या मनमर्जीने काम सुरु करण्यात आले. मनमर्जीने काम करत असल्याने पाईप लाईनचे काम कुठपर्यंत शक्य होणार? हे कळत नाही.सन २००९-१० मध्ये जलस्वराज्य प्रकल्प योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र या योजनेचा जलकुंभ तीन कि.मी. अंतरावर असून, नियमितपणे पाईप लाईनमध्ये बिघाड येत असल्याने नळ योजना कधी बंद तर कधी सुरु राहत होती. यावर्षी उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा योजना म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग तुमसर या विभागाअंतर्गत १ लाख ९४ हजार रुपयाची तरतूद करून दुरुस्तीच्या नावावर पैसा खर्च करून लाटण्याचा प्रकार दिसून आला होता. लाखो रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा योजना सुरु झाली नाही. आतापर्यंत किती सरपंच आले आणि गेले सर्वांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. यावर्षी पुन्हा दुरुस्तीच्या नावावर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली असून या कामात अनियमितता दिसून येत आहे. सालई खुर्द हे ४५० कुटुंबाचे गाव असून एकूण लोकसंख्या दोन हजार ४०० च्या जवळपास आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. सात वर्षांपासून गावकरी नळ योजनेचे पाण्यापासून कोसो दूर आहे. पाण्याच्या सोयीकरिता नळ योजनेचे काम भंडारा येथील नितीन निर्वाण नामक कंत्राटदाराला असल्याचे दिवांजी व अधिकारी यांनी सांगितले असून त्याने नवीन पाईप लाईन तयार करताना अनियमितता आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. राजू सव्वालाखे, प्रविण लिल्हारे व गावातील वरिष्ठ नागरिकांनी सांगितले की, पाईप लाईन ही तात्पुरती नसून दीर्घकालीन आहे. त्यामुळे पाईप लाईन घालताना काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. पाईप लाईन घालताना कमीत कमी ३ फुटाची खोली असणे गरजेचे आहे. त्यातील माती काढून रेती घालून नंतर पाईप घालावे लागते. परंतु कंत्राटदाराने असे काहीही केले नाही. जेसीबीने माती खोदून त्याठिकाणी पाईप घातले व जेसीबीच्याच सहाय्याने पाईप बुजविण्यात आले आहेत. पाईप लाईन बुजवते वेळी त्या पाईपवर मोठे दगड पडत असल्याचे दिसून आले. भविष्यात ही पाईप लाईन संकटात येईल, पाईप लाईन टाकते वेळी खाल उंच भरारी घेवून टाकण्यात येत आहे. नागठाणा विहिरीपासून तर गावाजवळ पर्यंत अशीच स्थिती असल्याचे गावकºयांनी सांगितले. पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना दीड ते दोन फुट खोली दिसून आल्यावर नागरिकांनी खोदकाम थांबविण्याची सूचना जेसीबी चालकांना दिली. मात्र काम थांबविण्यात आले नाही.पाईपलाईन फिटींगचे काम दोनशे रुपये मजूर वर्गाकडून करत असल्याने ही पाणी पुरवठा योजना भविष्यात खंडीत झाल्याशिवाय राहणार नाही? अशी भिती नागरिकांना वाटत आहे. यात आर.राठोड कनिष्ट अभियंता पाणी पुरवठा विभाग तुमसर, कंत्राटदार नितीन निर्वाण, ग्रामसेवक, ग्रा.पं. पदाधिकारी यांची साठगाठ असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.पी.व्ही.सी. पाईप निकृष्ट दर्जाचे वापरले जात असून खोदकामात अनियमितता, पाईप घालताना कसलीही काळजी न घेणे अशा अनेक चुका केल्या जात आहेत.याबाबत विचारल्यावर अधिकारी कंत्राटदार बेजबाबदारपणाचे उत्तरे देतात. सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामात मनमानी चालत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग तुमसर कानाडोळा करीत असल्याने जिल्हाधिकारी भंडारा व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा हे कोणते पाऊल उचलतात, याकडे गावकºयांचे विशेष लक्ष वेधले आहे.
सालई नळयोजनेच्या कामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 10:29 PM
मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देऊन तसे आदेश कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांची नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकींग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी सालई खुर्द येथील नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देसात वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत : ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष