अहवालावर प्रश्नचिन्ह : नगरविकास खात्याकडे तक्रार, संत जगनाडे वॉर्डातील प्रकारतुमसर : तुमसर नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ संत जगनाडे नगरात नाली बांधकामात अनियमिततेची तक्रार करण्यात आली होती. चौकशी अधिकाऱ्यांनी संक्षिप्त अहवाल दिला, परंतु सदर अहवालात बरीच तफावत आहे. तक्रारकर्त्यांनी पुन्हा नगरविकास खात्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.संत जगनाडे नगरात रस्ता अनुदान योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मध्ये टेंभरे ते नागोसे ते पंचभाई, नाईक व कोरे ते शुक्ला ते धारपांडे नाली व कव्हरचे बांधकाम करणे होते. याकरिता तांत्रिक मान्यता व ६ लक्ष ५५० ठोबळ निधी मंजूर करण्यात आली. कामाचा आदेश ९ सप्टेंबर २०१५ देण्यात आले. कंत्राटदार ए.ए. रिजवी होते. कामाचे दर अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा ९ टक्के जास्त दराने ठरविण्यात आले. कामाचा कालावधी तीन महिन्याचा होता. ३० सप्टेंबरला कामे पूर्ण झाली. या कामावर ५ लक्ष २५ हजार २२९ खर्च करण्यात आला. या कामाचे मोजमाप ३० सप्टेंबर रोजी करण्यात आले. काम तपासणी १२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. तक्रारीनंतर कामाची तपासणी शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम आर.एम. गभने व प्रकलप अधिकारी भंडारा देवळीकर यांनी केले. तक्रारकर्ते सुनिल थोटे यांनी मोजमाप पुस्तिकेप्रमाणे १२० मीटर नालीचे बांधकाम दाखविण्यात आले, परंतु प्रत्यक्षात फक्त ९० मीटर नाली बांधकाम करण्यात आले, अशी तक्रार केली होती. सदर नामाची पाहणी केली असता कनिष्ठ अभियंता सोनटक्के यांनी चौकशी अधिकाऱ्यांना कामे दाखविली. नालीचे बांधकाम १२१ मीटर आढळली. नालीवर आच्छादनही नव्हते. पंचभाई ते नाईक यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम कव्हरसह लांबी ६८ मीटर असे अहवालात नमूद केले आहे. परंतू दोन्ही नागरिकांचे घरे या प्रभागात नाही. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या माहितीत नाली बांधकाम झाल्याची माहिती दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माहितीत तफावत आहे. पंचभाई ते नाईक हे गृहस्थ या प्रभागात राहत नाही त्यामुळे ६८ मीटर नालीचे बांधकाम झाले नाही. तक्रारीनंतर केवळ काही ठिकाणी नालीवर कव्हर घालण्यात आले. येथे अहवालावरच प्रश्नचिन्ह आहे, अशी तक्रार सुनिल थोटे यांनी नगर विकास खात्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नाली बांधकामात अनियमितता
By admin | Published: July 10, 2016 12:21 AM