शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

‘मड्डा’ झालेल्या भात पिकात सिंचनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 9:46 PM

निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची आशा: राजकारण भोवले, दुष्काळाचे सावट

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे.मोहाडी परिसरात शेवटच्या टोकावरील भात शेतीत सिंचनासाठी पंचविस दिवस उशिरा पाणी आले. आधीच पऱ्हे करपले होते. हेच पाणी पंचवीस दिवसापूर्वी टेलवर शेतीत पोहचला असता तर अर्धेतरी पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असते. रोहणा, दहेगाव, चिचखेडा, मोहगावदेवी, कान्हळगाव, मोरगाव, महालगाव, सिरसोली या परिसरातील अनेक भात पिकांचे तणस झाले असून शेतकरी तणस कापू लागले आहेत. पण काही भागात भात पीक करपले असतानाही शेतकरी मड्डा झालेल्या पिकांना सिंचन करीत आहेत. मड्डा म्हणजे परिपक्व न होता वाळलेले धान पीक होय. अनेक शेतात मड्डा झाला असताना शेतकरी मोठ्या आशेने आजही सिंचन करीत आहेत.मागील वर्षीही मोहाडी तालुक्यातील गावांना दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसला होता. याहीवर्षी टेलवरील तसेच कान्हळगाव (सिर) येथील मायनर क्र.चारमधील अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक भाजून गेले आहे. अशा भाजलेल्या पिकात उभे राहून काहीतरी पीक घरी नेता येईल ही आशा ठेवून शेतकरी सिंचन करीत आहे. पेंचचे पाणी आले असतानाही शेतात डिझेल पंपचे आवाज सुरुच आहेत. डिझेलपंप, ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही शेतीला सिंचन करणे सुरुच आहे.पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांसाठी नाही. विणवणी केलीच तर उपकारापोटी शेतकºयांना खरीप पिकासाठी पाणी दिल्या जाते. त्यासाठी उपोषण, आंदोलन, रास्ता रोको, तोडफोड आदी शस्त्राचा उपयोग केल्यावर पाणी मिळते. अन्नदात्यांच्या बळावर स्वत:चा सन्मान करून घेणारे राजकारणी मंडळी किती संवेदनशील आहेत याबाबत निश्चितच शंका आहे. सिंचन करण्यासाठी श्रेयाची अप्रत्यक्ष - प्रत्यक्ष लढाई केली जाते. या शीतयुद्धात भरडला जातो शेतकरी. असाच किस्सा, यावर्षी पेंचच्या पाण्याच्या राजकारणात बघायला मिळाला. पेंचचे पाणी सुटण्यापूर्वीच कधी पाणी येईल याचे भविष्य एका नेत्याने केले होते. ती भविष्यवाणी तोंडघाशी पडली. जाहिररित्या प्रचार करणारा तो नेता आपले दोष झाकण्यासाठी पेंचच्या अधिकाऱ्यांना दोष देत सुटला होता. सिंचनाचा गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे उपोषण तोडण्याचा निष्फळ प्रयत्न केला. या संघर्षाचा परिणाम शेतकऱ्यांना भोवला आहे.दिवाळी सण अगदी तोंडावर आहे. या सणासुदीच्या दिवसात शेतकºयांच्या चेहºयावर निराशा दिसून येत आहे. पावसाने दगा दिला. पेंचचे पाणी उशिरा आले. करपा, तुडतुड्याने ही हल्ला केला. या निसर्ग व पेंच यंत्रणेच्या प्रकोपाने शेतकºयांना दुष्काळाच्या दुष्टचक्रात घातले गेले. पेंचचा पेच, दुष्टचक्र कधी थांबणार व शेतकरी कधी समृद्ध होणार याची किती प्रतीक्षा करायची असा सवाल केला जात आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.आम्हाला कर्जमाफी नको. शेतीला सिंचन हवा. शासनाने खोट्या सन्मानाचा ढोल बडवू नये. शेतकऱ्यांचा विचार केवळ मतासाठी केला जातो.- वाल्मीक मुटकुरे,शेतकरी, कान्हळगाव (सिर)