शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:51 AM

पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : ७२५ क्युसेक पाणी सोडण्याची किसान सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी सोडण्या तयावे या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या उपोषण सुर ुआहे. उपोषण दरम्यान पेंच प्रकल्पाचे जबाबदार अधिकाºयांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. उलट पेंच कार्यालयाचा चतुर्थ कर्मचारी पाठवून शेतकºयांची टिंगल केली. पेंच प्रकल्पाचे २० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले तरी शेवटच्या लाभक्षेत्रात दोन दिवसात पाणी पोहचेल या विषयी साशंकता व्यक्त केली.त्यासाठी मोहाडी सहकारी खरेदी विक्री समिती मोहाडीच्या सभागृहात किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला माधवराव बांते, मणिकराव कुकडकर, डॉ. प्रा. सुनिल चवळे, नितीन मोहारे, राजु उपरकर, जयप्रकाश मसर्के उपस्थित होते. पेंच प्रकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्याची मागणी करण्यात आली. पेंच कडून कालव्यात ७२५ क्युसेक पाणी सोडला पाहिजे. पण ५०० व त्यापेक्षा कमी क्युसेक पाणी सोडला जातो. त्यामुळे पाणी लवकर मिळत नाही.तसेच टेल टू हेड या नियमाने कधी पाण्याचे वितरण केले जात नाही. शेवटच्या टोकावर दोन दिवसात पाणी पोहचण्यासाठी पेंच प्रशासन व पाणी वापर संस्थेने कामगार व पोलीस यंत्रणा लावली तरच योग्यवेळी पाणी मिळेल. अन्यथा असेच ढिसाळ व्यवस्थापन राहिले तर शेवटच्या टोकावर पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाची शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागेल. अशी शंका किसान सभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तोपर्यंत धानाचे गर्भ आटून उत्पादनावर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यत आले.पेंच प्रशासनाने शेवटच्या टोकापर्यंत कधी पाणी येईल याची तारीख लेखी कळवावे. अन्यथा आता शेतकरी उपोषण करण्यासोबतच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचाही इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. किसान सभेचा आंदोलन आजही सुरुच आहे. वाल्मीक मुटकुरे, बंडू पापडकर वसंता कस्तुरे उपोषणावर बसली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर पैसा जातो. कुठे असा सवाल करीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. याची चौकशी व्हावी अशी मागणी किसान सभेने पत्रकार परिषदेत केली. पेंच प्रकल्पाचे पाणी हेक्टर कार्यक्षेत्रानुसार सोडण्यात आले तर सिंचनासाठी वेळ लागणार नाही, असेही किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेती