मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते. अखेर साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा काशीवार यांनी पुढाकार घेत या तलावाचे पुनरुज्जीवन केले. आता तब्बल ४० वर्षानंतर देवरी गोंदी तलावाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार आहे.लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार बाळा काशीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच देवरी गोंदी तलाव केवळ सदोष कालव्यामुळे सिंचनात अपयशी ठरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जलस्वराज्य योजनेतून ७० लाख आणि खनीज विकास योजनेतून ४० लाख रुपये मंजूर करवून घेतले. यासाठी जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.आता ६०० मीटर लांबीच्या कालव्याचे सीमेंटीकरण करण्यात येत आहे. या कामावर अभियंता सुशांत गडकरी व एस.एन. राऊत लक्ष देऊन आहेत.
देवरी तलावातून ४० वर्षानंतर होणार सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:11 AM
दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते.
ठळक मुद्देसंडे अँकर । आमदारांच्या पुढाकाराने जलस्वराज्यातून ७० लाख व खनीज विकासातून ४० लाख निधी