शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अंधश्रध्देचा नायनाट होणे गरजेचे

By admin | Published: January 05, 2016 12:39 AM

श्रध्दाळू लोकांची फसवणूक करुन त्यांना गंडविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रध्देला बळी न पडता जागरुक राहावे, ...

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा : प्रिया शहारे यांचे प्रतिपादनभंडारा : श्रध्दाळू लोकांची फसवणूक करुन त्यांना गंडविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रध्देला बळी न पडता जागरुक राहावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना अंधश्रध्देचा नायनाट होणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या महिला संघटीका प्रिया शहारे यांनी केले.पोलीस मुख्यालय येथील पोलीस सभागृहात रेझिंग डे च्या निमित्ताने आज, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) धात्रक उपस्थित होते. कार्यशाळेला प्रमुख वक्ते अंनिसचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, जिल्हा महिला संघटिका प्रिया शहारे उपस्थित होते. प्रास्ताविक मुलचंद कुकडे यांनी केले. त्यांनी तंत्र-मंत्र व जादुटोण्याच्या नावावर आतापर्यंत कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले. कितीतरी निर्दोष लोकांचा बळी घेण्यात आला, असे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.यावेळी प्रिया शहारे यांनी शिक्षित व अशिक्षित असे दोन्ही समाज अंधश्रद्धेने ग्रासले आहेत. काही समाजकंटक लोक समाजाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात फासून आपला हेतू साध्य करीत आहेत. जगामध्ये तंत्र-मंत्र, भूत, प्रेत, जादूटोणा, चेटकीन वगैरे काही नसते. तंत्र-मंत्र, भूत प्रेत, जादूटोणा, चेटकीन यांच्या नावावर नाहक निर्देश व निष्पाप लोकंचा बळी घेतला जातो, असे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.मदन बांडेबुचे यांनी जे सत्य नाही ते सत्य आहे असे मानने आणि कोणतीही चौकशी न करता ते सत्य आहे असे मानने, म्हणजे अंधश्रद्धा होय. त्यांनी अंधश्रद्धेमुळे गुप्तधनासाठी लोकांनी कितीतरी निष्पाप लहान मुलांचे बळी घेतले आहेत, हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. (नगर प्रतिनिधी)