शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 6:56 PM

Bhandara News बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे.

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे. या प्रकरणात लेखा परिक्षकांच्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या तत्कालिन व्यवस्थापकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश कांबळे असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये प्रकाश कांबळे व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. दरम्यान, १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०२१ या काळात त्याने हा घोटाळा केला. खातेदारांच्या आवर्ती ठेव सभासदांच्या नावाने बोगस प्रमाणपत्र तयार करून त्याने रक्कम विड्राल केली. दोन टप्प्यांमध्ये २६,७७,२७७ रु. आणि ५९,६४६ रु. या प्रमाणे त्याने एकूण २७,३६,९३२ रुपये काढून हेराफेरी केली.

ही बाब पतसंस्थेच्या लेखापरिक्षणात पुढे आल्यावर लेखा परीक्षक श्रेणी-२ (सहकारी संस्था, साकोली) विकास गजानन पोहरकर (५२) यांनी भंडारा पोलिसात तक्रार केली. यावरून आरोपीविरोधात कलम ४२०, ४०९, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजी