लाखांदूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत तालुक्यातील राइस मिलर्सला धान उचल आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाला ७ हजार ९९२ मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, गत खरिपात तालुक्यात जवळपास २१ आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची मिलर्सद्वारा पिसाई करून गत काही दिवसांपासून स्थानिक लाखांदूर येथील शासकीय गोदामात तांदूळ जमा केले जात आहेत. मात्र, शासकीय गोदामात जमा करण्यात आलेला तांदूळ खाद्य पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार शासनाच्या राष्ट्रीय खाद्यान्न अधिनियमानुसार सार्वजनिक वितरणप्रणालीला वितरणासाठी दिला जाणार आहे. त्यानुसार तालुक्यातील शासकीय गोदामात मिलर्सद्वारा जमा करण्यात आलेला तांदूळ पुणे शहराला पुरवठा केला जाणार आहे.
सदर पुरवठ्यानुसार पुढील जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला २ हजार ६६४ मेट्रिक टनाप्रमाणे येत्या तीन महिन्यांत एकूण ७ हजार ९९२ मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे. मात्र, तालुक्यातील गत काही दिवसांपासून मिलर्सद्वारा पिसाई केलेल्या धानाची शासनाच्या खाद्यान्न विभागाच्या उचल प्रतिनिधी द्वारा तांदळाची उचल होत नसल्याने खरिपातील धानाची उचल बंद पडली आहे. सदर स्थितीत तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक गोदाम उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बॉक्स :
शासकीय गोदामाची क्षमता ५०० मेट्रिक टन
गत खरिपातील आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाची गत काही दिवसांपूर्वीपासून धान उचल करून पिसाई सुरू करण्यात आली. पिसाई करण्यात आलेल्या तांदळाची राज्यातील पुणे शहरातील खाद्यान्न विभागाला पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील शासकीय गोदामात तांदूळ जमा केले जात आहेत. मात्र, शासकीय गोदामाची क्षमता केवळ ५०० मेट्रिक टन तांदळाची असल्याने व स्थानिक वितरणप्रणालीचे अन्नधान्य पूर्वीपासूनच साठवण करून असल्याने गोदाम पूर्वीपासून भरलेले असून, मिलर्सद्वारे पिसाई केलेल्या तांदळाची उचल सध्यातरी थांबली आहे. या स्थितीत तालुक्यातील तांदूळ उचल होण्याहेतू अन्य गोदामे उपलब्ध करणे आवश्यक आहे.
बॉक्स
१० दिवसांपासून उभे आहेत तांदळाचे ट्रक
खरेदी केंद्रांतर्गत धानाची उचल व पिसाई करून तालुक्यातील काही मिलर्सद्वारे तांदूळ तालुक्यातील शासकीय गोदामात जमा करणे सुरू करण्यात आले आहे. मात्र, शासकीय गोदामाची क्षमता पूर्वीपासूनच कमी असल्याने व खाद्यान्न विभागाद्वारे उचल प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्याने गत १० दिवसांपासून तांदळाचे भरलेले ट्रक गोदाम परिसरात उभे असल्याचा आरोप केला जात आहे.
===Photopath===
310521\img-20210531-wa0029.jpg~310521\1237-img-20210531-wa0026.jpg
===Caption===
शासकीय गोदामासमोर असलेली तांदळाने भरलेल्या ट्र्कांची रांग~तालुक्यातील शासकीय धान्य गोदामाची ईमारत