शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:14 PM

जिल्ह्यात होत असलेल्या अवाजवी भारनियमनाविरूद्ध नागरिकांनी आवाज बुलंद केला आहे.

ठळक मुद्देविविध संघटना एकवटल्या : धारगाव येथे घेराव, अनेक ठिकाणी १६ तासांचे भारनियमन, अर्धे तुमसर शहर जाम फिडरवर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात होत असलेल्या अवाजवी भारनियमनाविरूद्ध नागरिकांनी आवाज बुलंद केला आहे. तात्पुरते नव्हे, हे तर जीवघेणे भारनियमन असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत. १६ तासांचे भारनियमन होत असल्यामुळे लघु उद्योगाला याचा फटका बसत आहे.धारगाव येथे अभियत्यांना घेरावआमगाव (दिघोरी) : १३ तासांच्या चा विद्युत भारनियमनाने ग्रामीण जनता होरपळून गेली असून धारगाव वीज वितरणाचे उपकेंद्रावर शेकडो ग्रामस्थांना मोर्चा नेऊन भारनियमन बंद करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव केला व भारनियमनाचे वेळापत्रक बदलविण्याचे निवेदन दिले. परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने धानपिके वाचविण्यासाठी शेतकºयाला मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने व १३ तास विद्युत पुरवठा बंद केल्या जात असल्याने शेतीला पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तसेच भारनियमनामुळे लघु उद्योगावर विपरित परिणाम पडला आहे.पावसाळ्याच्या दिवसामध्ये सरपटणाºया प्राण्यांची भीती मोठ्या प्रमाणात असते. रात्रीला गावामध्ये सर्वत्र काळोख पसरले असते. त्यामुळे घराबाहेर निघायला भीती असते. तसेच शाळकरी मुलांना अभ्यास करायला त्रास सहन करावा लागतो.भारनियमनरहित २४ तास वीज देण्याचे आश्वासन युती सरकारने दिले होते. त्यामुळे भारनियमन नागरिक विसरले होते. मागील चार दिवसापासून अचानक भारनियमन होत आहे. त्यात उकाड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीमध्ये घरात वीज असल्याने पंखा आणि कुलरही नाही तर बाहेरही हवा नाही. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या भारनियमनामुळे गावकºयांना पुन्हा राज्यातील आघाडी शासनाची आठवण झाली आहे. मात्र या भारनियमनावर शासन उपाय करणार काय? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे धारगाव येथे विद्युत कार्यालयावर माजी पं.स. सदस्य गुड्डू सार्वे, शेखर साखरे, हेमराज गिºहेपुंजे, संघदीप नंदेश्वर यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी मोर्चा नेला व अधिकाºयांना घेराव केला. यावेळी विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता फटे, ग्रामीण विभागाचे अभियंता प्रदीप भोयर व कनिष्ठ अभियंता एम.के. सिंग यांनी गावकºयांची समजूत काढली. उपविभागीय अभियंता (ग्रामीण) प्रदीप भोयर यांनी, भारनियमनाची ही समस्या तात्पुरती असून एक दोन दिवसामध्ये स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे सांगितले.महिलांचा कँडल मोर्चातुमसर : महावितरण विभागाने तुमसर शहराची विभागणी करून खापा टोली परिसराला ग्रामीण फिडरशी जोडल्याने तुमसरकरांना आठ तास भारनियमनाचे असह्य चटक्यामुळे महिला व छोटे बालके प्रभावित झाले आहेत. परिणामी तुमसरच्या रणरागिनी स्वयंप्रेरणेने प्रेरीत होऊन रस्त्यावर उतरून १५ रोजी महावितरणच्या कार्यालयावर कँडल मोर्चा काढणार आहेत. तुमसर तालुक्यात स्वाईन फ्ल्यू सारख्या अन्य संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता बसस्थानकवरून महावितरणच्या कार्यालयावर कँडलमार्च काढून खापा परिसरातील वीज तुमसर टाऊन फिडरवर करावी अन्यथा लोडशेडींग पूर्णत: बंद करण्याची मागणी करणार आहेत.कँडल मोर्चा हा लक्ष वेधून घेणारा असल्यामुळे खापा परिसरातील महिलांनी संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन उडाण संस्थेचे कल्याणी भुरे यांनी केले आहे.तुमसर : अर्ध्या शहराला ग्रामीण फिडरवरून वीज पुरवठा सुरु असल्याने भारनियमन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बुधवारी श्रीराम नगरवासीयांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत भारनियमन बंद न केल्यास १६ सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.उपकार्यकारी अभियंता रुपेश अवचट यांना निवेदन देऊन समस्येविषयी चर्चा केली. शहरातील श्रीरामनगर हे जाम फिडरवर जोडले आहे. शिष्टमंडळात योगेश सिंगनजुडे, नगरसेवक बाळा ठाकुर, सचिन गायधने, निरज गौर, जि.प. माजी सदस्य सुरेश रहागडे, कमलाकर निखाडे, शिव बोरकर, आशिष कुकडे, राकेश धार्मिक, हरिश दादलानी, विकास मते, अवी बडवाईक, शुभम तिडके, केशव मते, नरेश इळपाते, प्रशांत वासनिक, भूपेश वासनिक, प्रफुल्ल आस्वले, सुमीत मलेवार, कृषभ बाणासुरे, नरेंद्र कहालकर, अमरनाथ बडवाईक, अनिकेत बडवाईक उपस्थित होते. शिवसेनेचे वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, नरेश उचिबघले, नितीन सेलोकर, अमीत मेश्राम, मनोज चौबे, मनोहर जांगळे आदी उपस्थित होते.