बॉक्स
दुकाने बंद असल्याने अनेकांना कर्ज फेडण्याची चिंता
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दुकाने बंद ठेवा, या सरकारच्या निर्णयाचे ग्राहकातून समाधान होत असले तरी अनेक दुकानदारांना कर्ज फेडण्याची चिंता गेल्या काही दिवसापासून सतावत आहे. अनेकदा संचारबंदी तसेच लॉकडाऊन करण्यात आल्याने दुकाने बंद ठेवली होती. आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार करणे कठीण होत आहे, तर दुसरीकडे रुग्णांमध्ये भीती वाढत असल्याने सरकारने घेतलेल्या मिनी लॉकडाऊनने अनेकांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. मात्र दुकानदारांची कोरोना चाचणी सक्तीची करा, सरकारने दुकाने सरसकट बंद करण्याऐवजी दुकानदारांना नियमावली घालून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकातून होऊ लागली आहे.
कोट
नोकरी नसल्याने आजही अनेकांना दररोज काम कराल, तेव्हाच खायला मिळते. मात्र अशा परिस्थितीत सर्वात जास्त फटका हा गोरगरिबांना बसतो. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य वर्गाला समोर ठेवून कोणताही निर्णय घेण्याची गरज आहे. मिनी लॉकडाऊन करताना कुणाचीही गैरसोय होणार नाही, याचाही विचार करण्याची गरज आहे.
प्रीती गोडसेवाडे,
भाजपा जिल्हा महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष.
कोट
आम्हाला तीन महिन्याचा पगार एकदाच मिळतो. कधी कधी तोही वेळेवर होत नाही. पगाराला उशीर लागतो. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांबरोबरच महिलांना घरबसल्या उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
संगीता गिरीपुंजे, गृहिणी.
कोट
नोकरीच्या मागे न लागता अनेकांना व्यवसाय करण्याचा सल्ला शासनाकडून दिला जातो. मात्र अनेकांना ग्रामीण भागात व्यवसाय उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळत नाही. याशिवाय वाढत्या महागाईचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. गोरगरिबांचा सरकारने प्राधान्याने विचार करावा.
कल्याणी निखाडे, अध्यक्ष, लेझीम ग्रुप