शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:29 PM

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे.

ठळक मुद्देतरकसे यांचे प्रतिपादन : सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणाअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. यासाठी जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत भंडारा तालुक्यातील १० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा येथील प्रशिक्षण सभागृहात २३ ते २५ आॅगस्ट या कालावधीकरिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महिला प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचेकरिता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणवीर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक एन. व्ही. गणविर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, आर. एस. मांढरे, एस. एस. पिल्लेवान, डॉ. रेखा बोधनकर, मिलींद गजभिये, एस. जी. गणवीर, बी.व्ही. वैद्य, जितेंद्र वंजारी, अरविंद धारगावे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात १० गावातील कृषी सहाय्यक ११, ग्रामसेवक १०, सरपंच १०, महिला प्रतिनिधी ४, शेतकरी ११, उपसरपंच २ असे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी सागर बागडे, विवेक नंदनवार, वैषाली गणवीर, जागेश्वर पाल, शेतकरी आदींनी ंसहकार्य केले.