लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात पिक वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणातंर्गत उपाययोजना एकात्मिक पध्दतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन राबविल्यास पिण्याचे पाणी व संरक्षित देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल, यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व पवनी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या सयुंक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत भंडारा व पवनी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधी करिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमापं्रसगी ते बोलत होते.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचे एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अॅड़ संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, पंचायत समिती भंडारा सहायक गट विकास अधिकारी एस.एस. तामगाडगे, तालुका कृषी अधिकारी भंडारा व पवनी चे ए.डी. गजभिये, मंडळ कृषी अधिकारी एन.एन. गांगुर्डे आदी उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत भंडारा व पवनी तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकूण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा चे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी भंडारा व पवनी येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:54 PM
राज्यात पिक वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांसह १२० प्रशिक्षणार्थी सहभागी