जांब (लोहारा) : मोहाडी व तुमसर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या जांब लंजेरा पिटेसुर - रोंघा रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना वर्दळीसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याच मार्गावरून नागरिक शहराकडे जात असतात. त्यातच एसटीही याच रस्त्यावरून ये - जा करते. मात्र, खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पिटेसूर येथील सरपंच गुरूदेव भोंडे, रोंघा येथील सरपंच देवराम भोंडे, देऊळगाव येथील माजी उपसरपंच किशोर मोहणकर, तसेच परिसरातील जनतेने केली आहे.
जांब - लंजेरा - पिटेसुर - रोंघा रस्ता बनला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM