लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनीपासुन तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील पत्र्त्रा मेत्ता संघद्वारा निर्मित ऐतिहासिक प्राचीन बुध्द नगरी, भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतिक ठरलेल्या रुयाळ सिंदपूरी येथील महासमाधीभुमी महास्तुपाला १२ वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने ८ फेब्रुवारी रोजी धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्मोत्सवात देश, विदेशातील बौध्द भिक्कु येणार असून जनसागर उसळणार आहे.याठिकाणी उंच महास्तूप निर्माण करण्यात आला असून १५ फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बोधीसत्व देंग्योदाईशी साईच्यों यांची प्रत्येकी सहा-सहा फूट उंचीची ग्रेनाईटची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जपानच्या पत्र्त्रामेत्ता संघ कमेटीचे भदंत खोशो तानी यांच्या हस्ते, भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमामध्ये शांतीचे प्रतीक असलेले पांढरे वस्त्र परिधान करुन विदेशासह देशभरातून लाखोंचा जनसागर उसळणार आहे.या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
महासमाधीभूमी महास्तुपात आज उसळणार जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:17 AM