लाखांदूर : कोरोना संकट कारणाने मागील वर्षी २०२०-२१ मध्ये केंद्र सरकारच्या मानव विकास संसाधनाद्वारे आयोजित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय परीक्षा घेण्यात आली नव्हती. सदरील परीक्षा उद्या ११ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ५ केंद्रांतर्गत घेतली जाणार आहे. जवाहर नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीच्या ९०५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागील वर्षी तालुक्यात इयत्ता पाचवीचे एकूण १ हजार ७३५ विद्यार्थी पटसंख्या होती. त्यापैकी तब्बल ९०५ विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परीक्षेकरिता नामांकन केले होते. नामांकनाची ही संख्या संपूर्ण जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा तालुक्यातील ५ केंद्रांतर्गत आयोजित करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर, शिवाजी विद्यालय लाखांदूर, आंबेडकर विद्यालय लाखांदूर, गांधी विद्यालय बारव्हा व सुबोध विद्यालय मासळ आदी केंद्रांचा समावेश आहे.
उद्या पाचवीची जवाहर नवोदय परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:40 AM