लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या येथील जवाहर नवोदय विद्यालयाला तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हक्काची इमारत मिळाली. २२ एकरात उभारलेल्या या इमारतीच्या निर्माण कार्यासाठी २० कोटी खर्च करण्यात आले असून बुधवारपासून या इमारतीत वर्ग सुरु झाले आहे. सध्या येथे सातवी आणि आठवीचे वर्ग असून तेथे ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यात उत्साह तर पालकांत आनंद व्यक्त होत आहे.भंडारा येथील जवाहरनवोदय विद्यालयाच्या इमारतीचा प्रश्न गत चार वर्षांपासून अधांतरी होता. २०१७ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय भंडारा शहरातील जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात आले होते. एक वर्षानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे कारण देत अल्पसंख्याक वस्तीगृहात विद्यालय नेण्यात आले. परंतु तेथेही पर्यायी व्यवस्था नव्हती. पालकांनी यावरुन आंदोलने केली. जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर अचानक मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत जवाहर नवोदय विद्यालय नेण्यात आले. तीन वर्षांपासून विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. परंतु तेथेही सुविधांचा अभाव होता. पालकांनी या विरोधात मोर्चा काढून उपोषणही केले होते.त्यानंतर प्रशासनाने इमारतीसाठी जागेचा शोध सुरु केला. मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथील २२ एकर जमीन यासाठी अधिग्रहीत करण्यात आली. २० कोटी रुपये खर्च करुन इमारत बांधण्यात आली. बुधवार १२ फेब्रुवारी या नवीन इमारतीत वर्ग सुरु झाले आहे. आता विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत तयार झाल्याने इतर सर्व प्रश्न सुटतील अशी आशा पालकांना आहे.१८ वर्ग खोल्याजवाहर नवोदय विद्यालयाच्या पाचगाव येथील प्रशस्त इमारतीत १८ वर्ग खोल्या, तीन प्रात्याक्षिक कक्ष, ४० विद्यार्थी एकत्र बसुन अभ्यास करु शकेल अशी अभ्यासीका, संगणक कक्ष, वाचनालय, कर्मचारी कक्ष, वैद्यकिय सुविधा कक्ष, समुपदेशन कक्ष, संगीत कक्ष यासोबतच ५०० विद्यार्थी एकत्र बसून भोजन करु शकतील अशा मोठा हॉल येथे बांधण्यात आला आहे. शाळेला सुसज्ज असे खेळाचे मैदान असून त्यावर रनिंग ट्रॅक, हॉलीबॉल, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल आदींचा समावेश आहे. सर्व सुविधांनी युक्त इमारतीमुळे आता सर्व प्रश्न निकाली निघाले आहे.जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत तयार झाली आहे. बुधवारपासून तेथे वर्गही भरविले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाईल.-सम्राट टेंभुर्णीकर, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय
जवाहर नवोदय विद्यालयाला मिळाली हक्काची इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM
भंडारा येथील जवाहरनवोदय विद्यालयाच्या इमारतीचा प्रश्न गत चार वर्षांपासून अधांतरी होता. २०१७ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय भंडारा शहरातील जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात आले होते. एक वर्षानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे कारण देत अल्पसंख्याक वस्तीगृहात विद्यालय नेण्यात आले. परंतु तेथेही पर्यायी व्यवस्था नव्हती. पालकांनी यावरुन आंदोलने केली.
ठळक मुद्दे२० कोटींचा खर्च : चार वर्षांची प्रतीक्षा संपली, मोहाडीलगत पाचगाव शिवारात उभारली सुसज्ज वास्तू