पर्यटक वाढले : वर्षभरापासून ‘जय’ बेपत्ताच, ‘जय’च्या असण्याविषयी वनविभागाचे मौनअशोक पारधी पवनीउमरेड - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य एक वर्षापूर्वी ‘जय’च्या अधिवासामुळे जागतिक पातळीवर पोहचला. देशविदेशातील पर्यटकांनी अभयारण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे वनविभागाला कोट्यवधीचा महसूल मिळाला होता. अभयारण्यातून जय गायब होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली. परंतु आता त्याचा अपत्य असलेला जयचंद पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे जयंचद उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला तारणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पर्यटनाच्या दृष्टीने पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड- कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, रूयाड महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील पंचमुखी गणेशमूर्ती, वैजेश्वर मंदिर, प्राचीन मुरलीधर मंदीर, नदीवर बांधण्यात आलेले विविध घाट, जगन्नाथ मंदिर व उत्खननात सापडलेले बौध्द स्तुपाचे अवशेष, जवाहर गेट व प्राचीन काळातील वैभव असलेले परकोट या स्थळांना विशेष महत्त्व आहे.उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वनपरिक्षेत्रात विविध औषधी वनस्पती आहेत. वन्यप्राण्यांमध्ये हरिण, काळवीट, नीलगाय, गवा, वाघ व बिबट मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. व वनभ्रंमती करणाऱ्या पर्यटकांना दिसत असतात. कोरंभी लगत डोंगराळ भाग व गुहा असल्याने वन्यजीव व वाघांच्या अधिवासासाठी वातावरण पोषक आहे. अशावेळी अडीच तीन वर्षे वयाचा जयचंद हा जयची हुबेहुब प्रतिकृती आहे. पर्यटकांना दर्शन देत असल्यामुळे पवनी गेटमधून पर्यटकांची संख्या वाढत आहे. या पर्यटकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे जयचंद उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरला आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ‘जयचंद’ची भुरळ
By admin | Published: April 17, 2017 12:25 AM