आॅनलाईन लोकमतभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत स्थानिक प्रशसानाने अतिक्रमण निर्मूलनाची मोहिम मंगळवारी प्रत्यक्षरीत्या राबविली. यात जिल्हाधिकारी चौक ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुर्तफा असलेले अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात जेसीबीने काढण्यात आले. विशेष म्हणजे मंगळवार हा दिवस आठवडी बंदचा दिवस असल्याने दोन किलोमीटर अंतरावरील अतिक्रमण काढायला प्रशासनाला फारशी मेहनत घ्यावी लागली नाही.भंडारा नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे शहरातील त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात अनुक्रमे ३ व ८ नोव्हेंबरला ७५० अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. नोटीस मिळाल्यानंतर परिणामी रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात केली होती. याचाही फायदा मोहिमेला झाला. वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठाने झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर स्वरूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकाने थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्यातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली आहे. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. परिणामी अपघाताला आमंत्रण तर मिळतेच याशिवाय वाहतुकीच्या कोंडीला समोरे जावे लागते. दीड लाख लोकवस्तीच्या भंडारा शहरात अतिक्रमणाची समस्या पालिका प्रशासनासाठी गंभीर समस्या ठरली आहे. दर दोन वर्षांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत असली तरी तरी शेकडो लघु व्यावसायिकांची दुकाने उजाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
अतिक्रमणधारकांवर चालली जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:15 AM
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत स्थानिक प्रशसानाने अतिक्रमण निर्मूलनाची मोहिम मंगळवारी प्रत्यक्षरीत्या राबविली.
ठळक मुद्देबजावली होती नोटीस : नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार